34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeसोलापूरएकाच शाळेतील ४३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; सोलापूर जिल्ह्यातील अंत्रोळी येथील घटना

एकाच शाळेतील ४३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; सोलापूर जिल्ह्यातील अंत्रोळी येथील घटना

एकमत ऑनलाईन

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने बुधवारी त्यांची चाचणी करण्यात आली असता २१ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गुरुवारी पुन्हा विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली असता एकूण ४६ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव हे आरोग्य पथकासह अंत्रोळीला रवाना झाले आहेत. शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण गेल्या आठवड्यापासून वाढत आहेत. शाळांमध्येही विद्यार्थ्यांची दहा टक्के संख्या घटली होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी बैठक घेऊन ७ मार्चपर्यंत सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून धूळफेक – चित्रा वाघ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या