एकाच दिवसात सांगोला तहसील कार्यालयामधील सहाजन कोरोणा पॉझिटिव्ह
चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला शहर आणि उपनगरात कोरोनाविषाणू संदर्भात नगरपालिकेने जनजागृती करून नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला.तसेच वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली. विषाणूला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. यामध्येच कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरपालिका कार्यालयात कोरोना ने शिरगाव करीत चांगलाच धुमाकूळ घातला असताना आता कोरोनाने सांगोला तहसील कार्यालयात शिरकाव केला आहे.
काल सोमवारी एकाच दिवसात सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तालुक्यात दिवसेंदिवस आकडा वाढतच आहे. कोरोनाविषाणू चा आकडा आज हजारी पार केली आहे. सोमवार दिनांक 14 रोजी 78 रुग्ण सापडले आहेत. धोक्याचे इशारे जाणवु लागले आहेत .ज्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह येत आहेत. त्या कुटुंबातील व त्याच्या संपर्कातील कुटुंबांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे .तर अनेक जण जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत.
प्रशासन आपली भूमिका पार पाडताना कोरोणाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. सांगोला शहर आणि उपनगरांमध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव वाढवू नये यासाठी खबरदारी म्हणून शासनाच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत .अशा परिस्थितीमध्ये शहर आणि उपनगरांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाच्या उपयोजना व जनजागृती करताना प्रशासकीय कर्मचाऱ्यांना विषाणूचा सामना करावा लागत आहे . तहसील कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात इतर कर्मचारी आल्याने तहसील कार्यालयातील आकडा वाढणार की काय अशी चिंता वाढत आहे?