22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeसोलापूरप्रशासनाच्या प्रयत्नांना कोरोना पडतोय भारी

प्रशासनाच्या प्रयत्नांना कोरोना पडतोय भारी

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी : सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४०१ इतकी झाली असून १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. ५०६ रुग्णांवर उपचार सुरू असून ७७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सोलापूर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून प्रशासनाचे प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोना भारी पडत असल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीणभागात कोरोना डोके वर काढू लागला असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा आरोग् अधिकाºयांनी दिलेल्या अहवालानुसार मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे सारीचा तर अकलूज (ता. माळशिरस) येथील सुमित्रानगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. शुक्रवारी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ग्रामीण भागातील बाधितांची संख्या ११० इतकी झाली आहे.

Read More  ‘कुली नंबर 1’मध्ये वरून धवनचा नवा लूक व्हायरल

या अहवालानुसार अकलूज, सोहाळे या दोन गावांशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील पारधी वस्ती मुळेगाव तांडा येथे १, वळसंग येथे २, नवीन विडी घरकुल १ असे बाधित रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय मौलाली गल्ली अक्कलकोट येथेही एक रुग्ण सापडला आहे. वळसंग आणिसुमित्रा नगर अकलूज येथील रुग्ण हे संपर्कामुळे बाधित झाले आहेत. तर पारधी वस्ती मुळेगाव, नवीन विडी घरकुल, मौलाली गल्ली अक्कलकोट येथील बाधित रुग्ण हे सारीचे आढळून आले आहेत. शुक्रवारी ५४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर उर्वरित ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये ६ पुरुष व एका स्त्रीचा समावेश आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात ६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ७१ बाधित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पंढरपूर येथील भक्ती मार्ग परिसरात आढळला कोरोनाबाधित रुग्ण
टोकियोहून पंढरपूर येथील आपल्या आजी-आजोबांकडे आलेल्या एका चार वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. याबाबत प्रशासन सतर्क झाले आहे.  टोकियोहून काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील भक्तीमार्ग रोडवरील एका सोसायटीमध्ये राहात असलेल्या ठिकाणी एक कुटुंबा सोबत चार वर्षाचा मुलगा आला होता. या कुटुंबाला सोलापूर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. या दरम्यान त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांच्यातील चार वर्षाच्या लहान मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासनाकडून भक्तिमार्गचा एक किलोमीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या