23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeसोलापूरशहर-जिल्ह्यात कोरोनाने १० जणांचा मृत्यू

शहर-जिल्ह्यात कोरोनाने १० जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 125 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 717 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 592 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 75 पुरुष तर 50 महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर आज कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झाल्याने आज 192 जणांना घरी सोडण्यात आले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 29 हजार 744 एवढी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 878 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोनामुक्त झाल्याने ग्रामीण भागातील 25 हजार 825 जणांना आपापल्या घरी सोडण्यात आले आहे तर अद्यापही वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये तीन हजार 41 जण उपचार घेत आहेत.

आज पिलीव (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, खेडभोसे (ता. पंढरपूर) येथील 51 वर्षाची महिला, लिंकरोड पंढरपूर येथील 77 वर्षाचे पुरुष, बोराळे (ता. मंगळवेढा) येथील 44 वर्षाचे पुरुष, चिचुंबे (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाचे पुरुष, शनी गल्ली सांगोला येथील 50 वर्षाचे पुरुष, सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाची महिला, घाटोळे वस्ती दामाजी नगर मंगळवेढा येथील 70 वर्षाची महिला तर गादेगाव (ता. पंढरपूर) येथील 27 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तसेच शहरातील 331 संशयितांमध्ये 20 पुरुषांचा आणि आठ महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर सुरवसे नगरातील 84 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज ५६ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आयुक्­त पी. शिवशंकर यांनी केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे ते शक्­य होऊ लागल्याचे चित्र आहे.

मराठा वस्ती, टिळक चौक (उत्तर कसबा), देगाव नाका, नई जिंदगी, देगाव, कमलसिध्द अपार्टमेंट, आर्यनंदी नगर (वसंत विहार), बंजारा सोसायटी (विजयपूर रोड), पाटील नगर (सैफूल), जुना विडी घरकूल, साहिल नगर, टिळक नगर (मजरेवाडी), पदमांजली अपार्टमेंट (मोदी खाना), गुरुनानक नगर, सलगर वस्ती, न्यू पाच्छा पेठ, गोकूळ नगर (जुळे सोलापूर) आणि मंत्री चंडक नगर (रूपाभवानी मंदिराजवळ) आज नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत शहरातील पाच हजार 535 पुरुषांना तर तीन हजार 859 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील चार हजार 870 पुरुषांनी तर तीन हजार 464 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 92 संशयित व्यक्­ती होम क्­वारंटाईनमध्ये आहेत. तर अवघ्या 60 संशयितांना इन्स्टिट्यूशनल क्­वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

ट्रक कारच्या अपघातात नऊ जखमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या