24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeसोलापूरपत्नीला लावली कोरोना ड्युटी,राग आलेल्या पतीने मुख्याधापकालाच केली बेल्ट ने जबर मारहाण

पत्नीला लावली कोरोना ड्युटी,राग आलेल्या पतीने मुख्याधापकालाच केली बेल्ट ने जबर मारहाण

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शिक्षक पत्नीला कोरोना ड्युटी लावली म्हणून शिक्षिकेच्या पतीने सोशल हायस्कूलच्या मुख्याध्यापकास बेल्ट ने चोप देत मारहाण केली आहे.माझ्या पत्नीला कोरोनाची ड्यूटी का दिली ?असा जाब विचारत शिक्षिकेच्या पतीने मुख्याध्यापकावर हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ११ वाजता सोशल उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये घटना घडली.या घटनेची जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.सद्दाम जकीर नाईकवाडी (रा.सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेच्या पतीचे नाव आहे.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शाळा सुरू झाली होती. सद्दाम नाईकवाडी हा शाळेमध्ये आला,तो थेट मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये गेला.मला सहा महिन्याची मुलगी आहे माझ्या पत्नीला कोरोनाची ड्युटी का लावली? असा जाब विचारला. त्यावर मुख्याध्यापक असिफ इक्बाल अब्दुल सत्तार शेख (वय ४० रा. मुस्लिम पाच्छा पेठ) यांनी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ड्युटी देण्यात आली आहे असे सांगितले.यातून मुख्याध्यापकाला मारहाण करण्यास फोन करून बोलावून घेतले.दरम्यान सद्दाम नाईकवाडी तेथून निघून गेला.दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.त्यामुळे सद्दाम नाईकवाडी याने कमरेचा बेल्ट काढला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीत मुख्याध्यापक आसिफ शेख हे जखमी झाले.मारहाण झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी तत्काळ पोलिसांना फोन करून बोलून घेतले.दरम्यान सद्दाम नायकवाडी हा तेथून निघून गेला. याप्रकरणी मुख्याध्यापक आसिफ शेख यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, विनंती केल्यानंतर मुख्याध्यापकांनी अनेक शिक्षकांची ड्युटी रद्द केली आहे. मला सहा महिन्याची मुलगी आहे, ती दूध पिते.त्यामुळे तिला संसर्ग होईल म्हणून कोरोनाची ड्युटी पत्नीला देऊ नका अशी विनंती मुख्याध्यापकांकडे केली होती. मात्र,त्यांनी अरेरावीची भाषा केली असा आरोप शिक्षिकेचे पती सद्दाम नाईकवाडी यांनी केला आहे.

लेटरबॉम्बचा ‘प्रताप’!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या