23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहरात एन्ट्री करताच होणार कोरोना चाचणी

सोलापूर शहरात एन्ट्री करताच होणार कोरोना चाचणी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती बिकट झाली आहे. बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, मोहोल या तालुक्यात रुग्णवाढ मोठी आहे. या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागातून शहरात येणा-या प्रत्येक व्यक्तीची चाचणी नाकाबंदी पॉईंटवरच केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेचे वैद्यकीय पथक नियुक्त केल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

ग्रामीणभागात आतापर्यंत एक लाख एक हजार ४९८ जणांना कोरोनाची बाधा झाली. सध्या १६ हजार २४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुस-या लाटेत २ मे पर्यंत शहर-जिल्ह्यात साडेसोळा हजारांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्ण राहतील तथा एक लाख दहा हजारांपर्यंत एकूण रुग्ण होतील, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला होता. हा अंदाज खोटा ठरला. रुग्णसंख्या सव्वालाखांवर पोहचली आणि तीन हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात येणा-या व्यक्तींची कोरोना चाचणी पोलिसांच्या सहकार्यातून नाकाबंदीच्या ठिकाणी केली जाणार आहे. रुग्णांच्य लक्षणानुसार त्यांच्यावर पुढील उपचार केला जाणार आहेत.

शासकीय कार्यालयामध्ये १५ टक्के कर्मचा-यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तरीही शासकीय कर्मचारी असल्याचे ओळखपत्र जवळ ठेवून शहरात इतरत्र फिरत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. दुसरीकडे जुळे सोलापुरातील व्यक्ती तथा लहान व्यापारी भाजीपाला, किराणा माल अथवा औषधे खरेदीसाठी शहरात येत असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे विनाकारण शहरात वाहनाच्या माध्यमातून ये-जा करणा-यांकडील वाहने जप्त करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.

शहरात येणा-या रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी लावण्यात आली आहे. त्याठिकाणी वैद्यकीय पथकाच्या मदतीने शहरात येणा-यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना (सौम्य लक्षणे) कोविड केअर सेंटरला पाठविले जाईल, असे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

आपण बदलायला तयार आहोत का?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या