25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeसोलापूरकोरोनाच्या मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढली

कोरोनाच्या मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढली

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरातील कोरोना कमी होत असतानाच ग्रामीणमधील रूग्णसंख्या आणि वाढलेल्या मृत्यूदराने प्रशासनाचीचिंता वाढविली आहे. मुख्यमंर्त्यांच्या आवाहनानंतर माझे गाव-कोरोनामुक्­त गाव अभियानासाठी प्रयत्न करणारे प्रशासन मृत्यू रोखण्यात अपयशी ठरत आहे. मागील दीड महिन्यांपासून दररोज सरासरी 23 ते 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. बुधवारी जिल्ह्यातील नऊ तालुक्­यात 23 जणांचा मृत्यू झाला असून नवे 485 रूग्ण आढळले आहेत. तर शहरात 14 रूग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागातील अक्­कलकोट, बार्शी, मंगळवेढ्यातील प्रत्येकी दोन, करमाळा, माळशिरस, पंढरपूर तालुक्­यातील प्रत्येकी तिघांचा तर माढा, उत्तर सोलापूर तालुक्­यातील प्रत्येकी चौघांचा बुधवारी कोरोनाने बळी घेतला आहे. मृत्यूदरात चार-पाच तालुके अव्वल असतानाही जिल्हा प्रशासनाकडून नुसती बघ्याचीच भूमिका घेतली जात असल्याची चर्चा आहे. अनेकजण गावातच उपचार घेत असून आजार अंगावर काढत आहेत. मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात एक लाख 27 हजार 635 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील दोन हजार 798 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन हजार 199 रूग्णांवर उपचार सुरू असून शहरातील 216 रूग्ण उपचार घेत आहेत. शहरातील रूग्णसंख्या आता 28 हजार 362 झाली असून त्यातील 26 हजार 762 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

शहर-जिल्हा प्रशासन कोरोनामुक्­तीच्याचिंतेत असतानाच आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांने प्रशासनावरील ताण वाढला आहे. बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 419 रुग्णांपैकी 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 205 रुग्ण बरे झाले असून 180 रुग्णांवर 32 रुग्णालयातून उपचार सुरू आहेत.

शहरातील कोरोनाची दुसरी लाट पोलिस व महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे आटोक्­यात आली आहे. बुधवारी शहरात अवघे 14 रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे तीन, 16, 17, 21, 24, 25 हे प्रभाग वगळता उर्वरित सर्वच प्रभागांमध्ये बुधवारी एकही रुग्ण आढळला नाही. शहरातील नागरिकांनी कोरोनासंबंधीच्या नियमांचे तंतोतंत पालन करायला सुरू केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्­यात आल्याचे पोलिस आयुक्­त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

लोहा शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या