25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरउत्तर सोलापूर तालुक्यांमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेची बाब

उत्तर सोलापूर तालुक्यांमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेची बाब

एकमत ऑनलाईन

उत्तर सोलापूर : १६ एप्रिलच्या एकूण प्राप्त अहवालानुसार पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ११४५ असून उपचार चालू असलेले रुग्ण १४३, बरे होऊन घरी गेलेली रुग्ण ९५८, आतापर्यंत मृत्यू संख्या ४४ आहे. सध्या उपचार चालू असलेले रुग्ण कळमण १६, बीबीदारफळ ११, कवठाळी ९, वडाळा ८, रानमसले ५, मार्डी १५, तळे हिप्परगा १२, कारंबा ८, कोंडी ७, गुळवंची ६, र्ति­हे ५, हिरज ६, बेलाटी ७, डोनगाव ३, कवठे ४, पाथरी ४, नान्नज 2, आहेत.

एक वर्षापासून कोरोणा या संसर्गजन्य आजारापसून बचाव करण्यासाठी पूर्ण देशांमध्येच प्रयत्न चालू आहेत. उत्तर सोलापूर आरोग्य विभागामार्फत दररोज गावोगावी लसीकरण करणे, कोरोणा टेस्ट करणे, यावर भर दिला जातो. आज नान्नज, मार्डी, कोंडी येथे लसीकरण करण्यात आले. नान्नज मध्ये अंदाजे १६० पेक्षा जास्त, कोंडी मध्ये ५० पेक्षा जास्त, मार्डी मध्ये ६० पेक्षा जास्त लसीकरण शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत झालेले होते. आरोग्य विभागामार्फत प्रत्येक गावांमध्ये जनजागृती व लसीकरण केले जाते. तरीही रुग्णांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढ दिसते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मृताचा आकडा वाढत आहे. स्मशानभूमी मध्ये एका ठिकाणी दहा – दहा, वीस – वीस देहाला अग्नि दिलेले आपण पाहिले आहे.

राज्य सरकारने पाठीमागील आठवड्यापासून शनिवार रविवार कडकडीत बंद व आता अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी केलेली आहे. तरीही विनाकारण बाहेर पडणे, मास्क न वापरणे, सॅनेटायझर न वापरणे यासारख्या गोष्टीमुळे अजूनही कोरणा ची संख्या वाढत आहे. आरोग्य केंद्रामध्ये आता उपचारासाठी बेड उपलब्ध नाहीत. तसेच कर्मचारी वर्ग कमी पडताना दिसत आहे. जुन्या कर्मचा-यावर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: सावधान होऊन प्रशासनाला व आरोग्य विभागाला मदत करणे ही काळाची गरज आहे. विनाकारण बाहेर पडणे टाळावे. बाहेर पडताना मास्क वापरावा. प्रत्येक गावांमध्ये आयपीएल सट्टा, दारूचे धंदे, पान टप्प्यांमधून मावा यासारखे व्यवसाय चोरून चालतात. त्यामुळे रस्त्यावरती गर्दी पहावयास मिळते. काही दिवस प्रत्येक नागरिकाने आपापली जबाबदारी ओळखून जर कर्तव्य पार पाडले. तर या महामारी पासून आपली सर्वांची सुटका होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता जागृत होऊन माझे घर माझी जबाबदारी ओळखणे काळाची गरज आहे.

पाकणी येथे नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरणाची मोहीम लावण्यात यावी, यासाठी आरोग्य अधिकारी कुलकर्णी सर यांच्याकडे विनंती करण्यात आली.
-तुकाराम जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. पाकणी

नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. वय वर्ष ४५ वरील नागरिकांनी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे ३० ते ४० टक्के रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सोमवारी कळमण, रानमसले आणि मंगळवारी बीबीदारफळ येथे लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.. पुढील आठ दिवसात पाकणी येथे पण सुरू करू.
-डॉ.श्रीकांत कुलकर्णी आरोग्य अधिकारी उत्तर सोलापूर

आधार गरजूंना उपक्रमाचा खा. चिखलीकरांच्या हस्ते शुभारंभ; अवघ्या दोन दिवसात कोव्हीड रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या