24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरसंचारबंदीतही कोरोनाचा कहर

संचारबंदीतही कोरोनाचा कहर

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी १६ जुलैपासून कडक संचारबंदी लागू करण्यात आली़ शुक्रवारी या संचारबंदीचा आठवा दिवस होता मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झालेला दिसत नाही़ दररोज सरासरी शंभर रूग्णांची भर पडू लागली असून गुरूवारी १३५० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली त्यामध्ये १२७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत़ शहरातील रूग्णसंख्या ४३०५ झाली असून मृतांची संख्या ३३८ झाली आहे.

कोळी सोसायटी (इंदिरानगर), हनुमान नगर (भवानी पेठ), वडारगल्ली (बुधवार पेठ), संतोषनगर-मारूती गल्ली-खडक गल्ली-गुलमोहोर अपार्टमेंट (बाळे), शांतीनगर (जुना तुळजापूरनाका), सहारानगर, हत्तुरे नगर, बेडर कन्हैय्या नगर (मजरेवाडी), सिध्दार्थनगर (उ़ सदर बझार), हुच्चेश्वनगर-पंचशीलनगर-बालाजी नगर-लतादेवीनगर (कुमठा नाका), स्वामी विवेकानंद नगर-नवोदय टेरेस (होटगी रोड), सैफुल-निवारा नगर-ब्रह्मचैतन्यनगर- इंदिरानगर-शिवगंगानगर (विजापूर रोड), आसरा सोसायटी-कल्याणनगर-जानकी नगर-मिरा नगर (जुळे सोलापूर) यासह शहरातील विविध परिसरात कोरोना रूग्ण आढळलेले आहेत.

गुरूवारी झालेल्या अँटीजेन टेस्टमध्ये नवे रूग्ण सापडले त्याचा अहवाल महापालिकेकडून शुक्रवारी देण्यात आला़ गुरूवारी घेतलेल्या १३५० टेस्ट पैकी १२७ जणांचे पॉझिटीव्ह रिपोर्ट आले़ शास्त्रीनगर-आसरा सोसायटी-भवानी पेठ-मोदी आदी परिसरात चार पेक्षा अधिक रूग्ण सापडले़ एनजीमिल चार परिसरात ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला़ मृतांची संख्या ३३८ तर ४३०५ रूग्णांपैकी २४८६ रूग्णांनी कोरोनावर मात केली़ शहरातील २३९२९ व्यक्तींची कोरोना टेस्ट झाली असून रोज १ हजाराहून अधिक टेस्ट घेण्यात येत आहेत.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत २४२१ पॉझिटीव्ह रूग्ण आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे़ १६३१ जणावर उपचार सुरू असून ७३३ जण बरे झाले आहेत.

करमाळ्यात ६ कोरोनाबाधीत रुग्ण सापडले
करमाळा शहर व ग्रामीण भागामध्ये शुक्रवारी अखेर ६ रुग्ण बाधित सापडले आहेत तर आज एकूण २४ टेस्ट घेण्यात आल्या त्यामधील १८ निगेटिव्ह तर ६ बाधित आहेत त्यामध्ये फंड गल्लीतील १ पुरुष व ४ महिलांचा सामावेश आहे आळसुंदे येथील महिला रुग्णाचा समावेश आहे तसेच आज फळढउफ पद्धतीने २० स्वॅब घेण्यात आले याचे सर्व अहवाल आज मिळतील.

आजपर्यंत एकूण ७२ जण बाधित झालेले आहेत अशी माहिती करमाळा तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.
करमाळा शहरात कॉरोनाबधितचे वाढते प्रमाण लक्षात घेता आता शहरातील नागरिकांनी भाजीपाला विकत घेताना काळजी घेणे आवश्यक आहे व त्या भाजीवाल्याने मास्क वापरतोय का सॅनिटायझर त्याकडे आहे का हे पाहणे आवश्यक व गरजेचे आहे कारण हे जे कॉरोनाबधित लोक सापडले आहेत ते सर्व भाज्या विक्री करणारे आहेत अजूनही करमाळा शहरात विनाकारण गर्दी करून गप्पा मारणारे भरपूर प्रमाणात दिसत आहेत व मोटारसायकल वरून ही फिरताना दिसत आहेत याला एकच पर्याय दिसून येतो आहे की लॉकडॉवन सुरु झाला होता त्यावेळी जसे पोलीस प्रशासन यांनी जी भूमिका घेतली होती तशी आज घेण्याची गरज आहे असे सर्व सामान्य माणसाला वाटत आहे.

पंढरपूर तालुक्यातील २५जणांची कोरोनावर मात
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल असणारे, ग्रामीण व शहरी भागातील २५ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. आज पर्यंत ८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

तालुक्यात एमआयटी कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णांलय पंढरपूर व जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २५ जणांना कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने १० दिवस पूर्ण उपचार देऊन त्यांना घरी सोडण्यात आले. तालुक्यातील आजपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील ८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या 25 जणांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.प्रदिप केचे, डॉ. धनंजय सरोदे, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Read More  पोत्रा येथे सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या