22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeसोलापूरकोरोनाचा विळखा थेट विठुरायाला : मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन

कोरोनाचा विळखा थेट विठुरायाला : मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : कोरोनाचा विळखा आता थेट विठुरायाला बसला असून मंदिर परिसर देखील आता कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरातील 17 प्रभागात सध्या कंटेन्मेंट झोन असून तालुक्यातील तब्बल 27 गावात कोरोनाचा विळखा पडला आहे . यामध्ये तब्बल 21 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे .

अशावेळी आता तातडीने कम्युनिटी स्प्रेड थांबवण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्याची मागणी मनसेचे दिलीप धोत्रे यांनी केली आहे . याचसोबत कोरोनासाठी लागणारे औषधे , इंजेक्शन याच्या चढ्या भावात होणाऱ्या विक्रीवरही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी धोत्रे यांनी केली आहे .

सध्या कोरोनाची वाढती संख्या पाहता प्रशासनाला वारकरी संप्रदायाच्या मठांचा मोठा आधार मिळाला असून शहरातील 300 पेक्षा जास्त मठ ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे . या मठामध्ये नगरपालिकेच्या वतीने गाद्या पाठवण्यात येत असून अशा मठातून तब्बल तीन हजार नागरिकांना कॉरंटाईन करण्याची व्यवस्था प्रशासनाने करून ठेवली आहे . सध्या शहरातील संत गजानन महाराज मठ , तनपुरे महाराज मठ याशिवाय अनेक मठात कॉरंटाईन कुटुंबे आणून ठेवण्यात आली असून जशी गरज भासेल तसे इतर मठात नागरिकांना पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

Read More  थिएटर, मल्टिप्लेक्स सुरु करण्याची मागणी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या