32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeसोलापूरमनपाची थकबाकी वसूली मोहीम तीव्र

मनपाची थकबाकी वसूली मोहीम तीव्र

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेने मिळकत कर वसूलीची मोहीम तीव्र केली असून आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशावरून उपायुक्त जमीर लेंगरेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता अधिकारी पी. व्ही. थडसरे यांच्या उपस्थितीत वसूली मोहीम राबविण्यात आली.

बुधवारी विडी घरकुल, रविवार पेठ, सलगरवस्ती व ए एरिया भागात वसूली मोहीम राबविण्यात आली. विडी घरकुल येथे अशोक देवनपल्ली यांच्याकडून ६२ हजार २२३, जैतनबी होटगी ४६ हजार ६२८, अनुसय्या वड्डेपल्ली ९२ हजार ८०८ या थकबाकीपोटी तीन नळजोड कनेक्षन बंद करण्यात आले.

रविवार पेठ, सलगरवस्ती, ए एरिया, विडी घरकुलया भागातील मिळकतदाराकडून १६, ६९, १७३ इतकी रक्कम वसूल करण्यात आली. या मोहिमेमध्ये कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील शहापूरे, सितार, इंगोले, फुले, गुर्रम, सुरेंद्र गायकवाड, जोशी आदी कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

पतीसोबत राहण्यासाठी पत्नीवर बळजबरी चुकीची – सर्वोच्च न्यायालय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या