सोलापूर : कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत घटस्फोट झाल्यावर डॉ. विद्या (नाव) बदलले हिला डॉक्टर पतीकडून दरमहा तीन हजार रुपये घरभाडे आणि सात हजारांची पोटगी देण्याचा आदेश पंढरपूर येथील न्यायदंडाधिकारी आर. जी. कुंभार यांनी पतीला दिला.
पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयात दोघांना घटस्फोट मिळाला. त्यानंतर डॉ. विद्या हिने २०१५ मध्ये पतीविरुद्ध पोटगी आणि घरभाडे मिळण्याचा अर्ज दाखल केला होता. अर्जदार डॉक्टर पत्नी ही एका हॉस्पिटलमध्ये नोकरीस
असून, तिला स्वतःचे उत्पन्न असतानाही पोटगीसाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली.. अर्जदाराच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्रा धरून न्यायालयाने २०१५ पासून पोटगी अन् घरभाड्याची रक्कम देण्याचे आदेश डॉक्टर पतीला दिले.
पतीकडून तिला कोणत्याही प्रकाराचा त्रास देऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे. अर्जदार डॉक्टर पत्नीच्या वतीने इंद्रजित परिचारक, अॅड. ओंकार बुरकूल, अॅड. निखिल चिंचोळकर यांनी, तर डॉक्टर पतीच्या वतीने अॅड. विलास पिसाळ यांनी काम पाहिले.