21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्राइमभाड्याने दीलेल्या जनरेटरची चोरी, चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

भाड्याने दीलेल्या जनरेटरची चोरी, चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

एकमत ऑनलाईन

सोलापूर: भाड्याने दिलेले जनरेटर परत न करता आरोपींशी संगनमत करून जनरेटरची चोरी करत फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी काकडे यांनी दिले.

याप्रकरणी दीपाली नितीन भांगे (रा. भीमाशंकर थोबडे नगर), संभाजी शिवाजी जुगदार (रा. उमानगरी, मुरारजी पेठ), वनिता कोळी (रा. लक्ष्मीपेठ, दमाणी नगर) व शुभम हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रियांका भगवान भांगे (वय २८, रा. निराळे वस्ती) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रियांका यांच्या आईने आरोपी शुभम हॉस्पिटलचे व्यवस्थापक व संभाजी जुगदार यांना जनरेटर भाड्याने दिले होते. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादी व त्यांच्या आईने जनरेटर व भाड्याची मागणी केली

असता हॉस्पिटलचे व्यवस्थापक व
आरोपी जुगदार याने जनरेटर व भाडे देण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, आरोपी हॉस्पिटलचे व्यवस्थापक व जुगदार यांनी संगनमत करून आरोपी दीपाली भांगे व वनिता कोळी यांना जनरेटर चोरून नेण्यास मदत केली. हे जनरेटर पुणे-सोलापूर महामार्गावरील बसवंती पार्किंगमध्ये लावले. तसेच जनरेटर व त्याचे भाडे न देता फिर्यादी प्रियांका यांच्या आई वडिलांची फसवणूक केली, अशा आशयाची फिर्याद प्रियांका भांगे यांनीदिली.

प्रियांका ह्या पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यास गेल्या असता तेथील अधिकारी यांनी फिर्याद घेण्यास नकार दिल्याने त्यांनी अ‍ॅड. प्रथमेश शिंदे व अ‍ॅड. विष्णू बावर यांच्यामार्फत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला. फिर्यादीच्या विधीज्ञांनी कागदपत्रे व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करून युक्तिवाद केला. या युक्तिवादावरून सर्व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश फौजदार चावडी पोलीस यांना दिले. याप्रकरणी फिर्यादीतर्फे अ‍ॅड. प्रथमेश शिंदे, अ‍ॅड. विष्णू बाबर, अँड. शुभांगी लांडगे यांनी काम पाहिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या