अक्कलकोट : दुधनी (ता. अक्कलकोट) येथे पेन्टच्या दुकानासमोर फटाक्यांची माळ लावून नुकसान केल्याप्रकरणी वादविवाद झाला. त्या घटनेत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली आहे.
बुधवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी काशीनाथ यरगल (वय ३६, रा. दुधनी) हे दुकानात बसले होते. यावेळी चार मोटारसायकलवरून प्रकाश रायचूर, मल्लीनाथ कोटनूर, रामचंद्र अत्ते, सैदप्पा कोटनूर, अब्दुल सलीम नाकेदार, आसिफ मोमीन, संदीप कोटनूर, तमण्णप्पा कोटनूर, शशिकांत येळकी (सर्व रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांनी दुकानासमोर येऊन त्यांच्यासोबत आणलेल्या फटाक्यांच्या माळा व बॉक्स लावून उडविले. यावेळी फटाके पेटून, फुटून त्याचा धूर व काही फटाके दुकानात येऊन पडले. यानंतर जामीन झाला आहे, किंग इज बॅक असे मोठमोठ्याने ओरडून निघून गेले, अशी फिर्याद दिली.