19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeसोलापूरआर्थीक मदतीच्या आश्वासनानंतर मृृत बालीकेवर अन्त्यसंस्कार

आर्थीक मदतीच्या आश्वासनानंतर मृृत बालीकेवर अन्त्यसंस्कार

एकमत ऑनलाईन

सोलापूर : घराजवळ खेळताना विजेच्या खांबातून विद्युतप्रवाहाचा धक्का लागल्याने सातवर्षीय ऐमन बंदेनवाज बिराजदार या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मनपाने मृतांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे लेखी आदेश काढल्यानंतरच तिच्या नातेवाइकांनी २८ तासांनंतर मृतदेह ताब्यात घेत शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार केले. पण, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ही मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.

बिराजदार घरासमोरील बंद असलेल्या खांबावरील स्ट्रीट लाईट नुकताच लावण्यात आला होता. यामुळे ऐमन ही गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराजवळ लहान मुलांसोबत खेळत असताना तिला विजेच्या खांबातून करंट लागला. यातच तिचा मृत्यू झाला. यामुळे दोषींवर कारवाई व अन्य मागण्यांसाठी मृत ऐमन बिराजदारच्या नातेवाईकांनी शुक्रवारी दिवसभर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आंदोलन केले.

जर एखाद्या आमदार, खासदारच्या मुलाबाबत अशी घटना घडली असती तर अधिकारी हात झटकत, असे वागले असते का? घटनेला अनेक तास होऊनही याची जबाबदारी कोणीही घेत नाही. ही शोकांतिका आहे. पण मनपा आयुक्तांनी लेखी आदेश काढल्याने आम्ही मृतदेह ताब्यात घेतले आहे असे प्रहार संघटनेचे जमीर शेख यांनी सांगीतले. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तिच्या नातेवाइकांकडून सुरू होती. यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच त्यांचे कुटुंबीयांकडून आंदोलन करण्यात येत होते.

दरम्यान, मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी लेखी पत्र काढत या घटनेला एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस या कंपनीला प्रथमदर्शनी दोषी धरत, मृताच्या नातेवाइकांना मदत करणार असल्याचे सांगितले आहे. मनपाकडून नातेवाइकांना देण्यात येणारी मदतीची रक्कम ही त्या कंपनीच्या देय असलेल्या रकमेतून वजा करण्यात येईल, असे ही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत बसवण्यात आलेल्या पोलमध्ये विद्युत बँकेट बसवण्यात आले होते. हे बॅकेट खराब असल्याने ही घटना घडली आहे. याबाबतचा अहवाल आम्ही मनपाला दिला.या घटनेशी एमएसईबीचा संबंध नाही असे अतिरिक्त्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या