सोलापूर : राष्ट्रीय पक्षी मोर हा जखमी झाल्याने उपचाराच्या हेतूने तत्कालीन पोलिस आयुक्तांनी शासकीय निवास्थानी ठेवला होता. त्यावर पक्षीप्रेमी पंकजचिंदरकर यांनी वन विभागाकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने वन विभागाने तत्कालीन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांना नोटीस बजावली. त्यांनी अजूनही लिखित स्वरूपात म्हणणे सादर केले नसल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांच्यावर वन गुन्हा दाखल झाला आहे.
वन विभाग हा मुख्यत्वे निसर्गातील प्राणी, पक्ष्यांची देखभाल करते. जखमी प्राणी-पक्षांवर उपचार देखील वन विभाग करते. तरीदेखील, तत्कालिन पोलिस आयुक्त बैजल यांनी स्वत:च्या निवासस्थानी काही पक्षी ठेवले होते. त्यात काही इतर जखमी पक्षांचाही समावेश होता. त्यांचा हेतू स्वच्छ होता. पण, जखमी अवस्थेतील मोर (राष्ट्रीय पक्षी)किंवा इतर जंगली प्राणी, पक्षी वन विभागाच्या परस्पर जवळ ठेवता येत नाहीत. त्यासंदर्भात वन विभागाची पूर्वपरवानगी बंधनकारक असते. परवानगी देण्याचा पूर्णत: अधिकार वन विभागाला आहेत. पण, तत्कालीन पोलिस आयुक्तांनी कोणतीही परवानगी घेतली नाही, असे वन अधिका-यांनी सांगितले. त्यावर पंकजचिंदरकर यांनी दिलेल्या तक्रारी अनुसरून . बैजल यांना वन विभागाने नोटीस बजावली.
पहिल्या नोटिशीला काहीच उत्तर न दिल्याने पुन्हा काहीवेळा नोटीस पाठविण्यात आल्या. दरम्यान, त्यांनी चौकशीला सहकार्य न केल्यास संबंधितांविरूद्ध थेट गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही उपवनसंरक्षक . पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता माजी आयुक्त. बैजल हे वन विभागाला काय म्हणणे सादर करतात, याकडे लक्ष लागले आहे. तर वन विभागाने ‘रजिस्टर ए.डी.’द्वारे पाठविलेले पत्र गुरुवारी मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांना मिळाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.
चौकशीअंतीकिंवा सद्यस्थिती देखील संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. वेळोवेळी नोटीस देऊनही संबंधित व्यक्ती त्याला लिखित स्वरूपात उत्तर देत नसतील तर गुन्हा दाखल होईल. चौकशीला सहकार्य न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यावर न्यायालय निर्णय घेईल, असे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले. मोर जवळ बाळगण्यामागे जखमी अवस्थेतील मोर जिवंत राहावा हाच हेतू होता. मोरासह इतर पक्षांवर पोलिस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी उपचार केले जात असल्याचे पत्र पोलिस विभागाकडून वन विभागाला देण्यात पाठविण्यात आले होते असे मानद वन्य जीवरक्षक भरत छेडा यांनी सांगीतले.