25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूरचारित्र्याचा संशय घेत पत्नीचे केशमुंडन, पती, सासु-सास-यावर गुन्हा

चारित्र्याचा संशय घेत पत्नीचे केशमुंडन, पती, सासु-सास-यावर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहेत. पतीने आपल्या पत्नीवर चारिर्त्याचा संशय घेत तिचे संपूर्ण केस कापत तिचं मुंडन केले. माहेरहून पाच लाख रुपये रोख रक्कम आण असा तगादा लावला. जवळपास महिनाभर एका खोलीत डांबून ठेवले तसेच घरगुती भांडणाचा राग मनात धरून तोंडी तीन वेळा तलाख देत तिला माहेरी आणून सोडले असा आरोप करत संबंधित विवाहित महिलेने जेलरोड पोलिस ठाण्यात पती व सासूसास-याविरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी सर्व खात्री करून, शहनिशा करून मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती, सासू व सास-या विरोधात भा.द.वि.498 (अ),323, 504, 506, मुस्लिम संरक्षण कायदा 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला .सुमैया कलीम चौधरी (वय 20 वर्ष, रा, राजेन्द्र चौक लापूर) असे विवाहित महिलेचे नाव आहे. तर पती कलीम सत्तार चौधरी (वय 25, रा राजेंद्र चौक,सोलापूर),सासू राजिया सत्तार चौधरी(वय 55 वर्ष, रा, राजेंद्र चौक, सोलापूर), सासरे सत्तार चौधरी ( वय 60 वर्ष, रा, राजेंद्र चौक, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.सुमैया व कलीम या दोघांचे लग्न मुस्लिम धर्मरितीरिवाज नुसार 13 मे 2022 रोजी लग्न झाले होते. दोन महिने चांगले नांदविल्या नंतर घरगुती कारणामुळे दोघा पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले.

सुमैया या विवाहित महिलेने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, पतीने माझ्या चारिर्त्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्रास देण्यास सुरुवात केली. सुमैया या विवाहितेचा पती फुलांचा व्यवसाय करतो. व्यवसायासाठी व घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपयांची रक्कम आण असा तगादा लावला होता. तसेच चारिर्त्याचा संशय देखील घेत होता. तीन महिन्या अगोदर पतीने एका कंिटग दुकानधारकाला घरी बोलावून पत्नीचे संपूर्ण केस कापले व टक्कल केले.

काही दिवसांनी घरात पुन्हा किरकोळ वादविवाद झाले, यानंतर पती कलीम चौधरी याने राहत्या घरी रागाच्या भरात तीन वेळा तोंडी तलाक देत माहेरी आणून सोडले.पती कलीम व पत्नी सुमैया या दोघांत घरगुती कारणावरून 22 दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पती याने तोंडी तीन वेळा तलाख दिला आणि माहेरी आणून सोडले. त्यावेळी सुमैया याच्या आई वडिलांना माहिती झाले की, आपल्या मुलीचे डोक्यावरील सर्व केस काढण्यात आले आहेत. त्यांनी कलीम चौधरी व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना मुंडन का केले याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, पती कलीम याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर मंगळवारी दिवसभर पोलिसांनी सर्व बाबी तपासून, सुमैया याची फिर्याद लिहून घेतली आणि जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पीएसआय राठोड करत आहेत..

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या