24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeसोलापूरकरमाळ्यातील अपघातप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

करमाळ्यातील अपघातप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

करमाळा : करमाळा बायपास रस्त्यावर राजयोग हॉटेलसमोर झालेल्या अपघातप्रकरणी अखेर अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील मुलीच्या खांद्याला व पाठीला गंभीर जखम झाली आहे. यामध्ये जखमी झालेल्या मुलीच्या भावाने फिर्याद दिली. कोयल प्रल्हाद घुले (रा. सरस्वती नगर, करमाळा) असे जखमी मुलीचे नाव आहे. सोमवार दि. १६ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता.

दुचाकी व पिकअप यांच्यात करमाळा बायपासला राजयोग हॉटेलसमोर हा अपघात झाला होता. फिर्यादी कृष्णा प्रल्हाद घुले (२१) व त्याची बहीण कोयल हे दुचाकीवरून जात होते. तेव्हा मागून पिकअपने त्यांना जोराची धडक दिली. त्यात कृष्णा यांच्या हाताला व बहीण कोयला खांद्याला व पाठीला गंभीर जखम झाली. पिकअप चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाला होता

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या