19.1 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home सोलापूर रोडवर वाहन अडवून, वाहनाची जबरी चोरी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ...

रोडवर वाहन अडवून, वाहनाची जबरी चोरी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद

एकमत ऑनलाईन

सोलापूर : 28 जुन 2020 रोजी रात्री 23:30 वा. ते 29 जुन 2020 रोजी 02:30 वा. च्या दरम्यान फिर्यादी आपले ताब्यातील स्विफ्ट कार नंबर एमएच 12 एजे 2606 या वाहनाने पुणे ते उस्मानाबाद असे जात असताना कुर्डूवाडी चैक टेंभूर्णी येथे आल्यावर यातील अनोळखी चोरटयांनी पल्सर मोटार सायकलने कारचा पाठलाग करून टेंभूर्णी ते कुर्डूवाडी असे जात असताना त्यांना रस्त्यात तीन ठिकाणी कार आडविण्याचा प्रयत्न करून फिर्यादी आंबड ता. माढा गांवचे जवळ आल्यानंतर कारला मोटार सायकल आडवी लावून फिर्यादीस दमदाटी करून कारचा ताबा घेवून त्यास वालचंद नगर ता. इंदापूर येथील निर्जन स्थळी नेवून त्याचेजवळील रोख रक्कम, मोबाईल व कारसह 9 लाख 23 हजार 500 रू. (9,23,500/-)किंमतीचा ऐवज जबरदस्तीने नेले म्हणून यातील फिर्यादी प्रशांत विजयकुमार लांडगे(वय-23 धंदा-ट्रान्सपोर्ट,रा-रेबेंिचचोलीजि.प.षळेजवळ,ता-लोहारा,जि-उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिले वरून टेंभूर्णी पोलीस ठाणे येथे गुरंन 430/2020 भादविसंक 392, 341, 363, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.

पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर जिल्हयातील उघडकीस न आलेले गंभीर स्वरूपांचे गुन्हयांचा आढावा घेवून सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी जिल्हयातील पोलीस अधिकारी यांची बैठक घेवून सर्वांना आदेशीत केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत, सर्जेराव पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी पथक नेमले होते. सदरचे पथक टेंभूर्णी भागात असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इंदापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार व त्याचे इतर साथिदार यांनी मिळून केला असून ते गुन्हयातील चोरलेली पांढरी स्विफ्ट कार व त्याचा साथिदार हा त्याचे जवळील पल्सर मोटार सायकलसह टेंभूर्णी येथील ग्यानी सरदार ढाबा येथे थांबले असल्याचे खात्रीषीर बातमी मिळाली. त्यानुसार मिळालेली बातमी वरिश्ठांना कळविले असता त्यांनी बातमी प्रमाणे कारवाई करणेकामी सूचना दिल्या.

स्थानिक गुन्हे षाखेकडील पथकाने मिळालेल्या बातमी प्रमाणे टेंभूर्णी येथील ग्यानी सरदार ढाबा येथे जावून खात्री केली असता ढाब्या समोर एक पांढ-या रंगाची स्विफ्ट कार मागे पुढे नंबर प्लेट नसलेली व तिचे जवळ एक पल्सर मोटार सायकल लावलेली दिसून आली. तेथे स्विफ्ट कारमध्ये दोन इसम बसलेले दिसले, त्यांचा बातमी प्रमाणे संषय आल्याने त्यांना जागीच पकडले. पकडलेल्या संषयित इसमांना गाडीचे कागदपत्राची मागणी केली असता, कागदपत्र नसल्याचे सांगून सदरची कार आज सुमारे पाच महिन्यापूर्वी टेंभूर्णी ते आंबाड ता. माढा जाणा-या रोडवर पल्सर मोटार सायकलने कारचा पाठलाग करून कारचा ताबा घेवून कार वालचंद नगर भागातील निर्जनस्थळी नेवून फिर्यादीची कार, मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने चोरले असल्याचे सांगितले. त्यांचे कब्जातून गुन्हयात चोरलेली स्विफ्ट कार व गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटार सायकल व कारमध्ये एक तलवार असा एकूण 9 लाख 51 हजार रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचे दोन्ही आरोपी हे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर इंदापूर पोलीस ठाणेस मालाविशयी व षरिराविशयीचे गुन्हे दाखल असून त्यांचेकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची षक्यता आहे.

सदरची कामगिरीपोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकअरूण सावंत, सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोहेकॉ/ बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, पोना/ बापू ंिषदे, लालंिसग राठोड, महिला पोना/ मोहिनी भोगे, पोकॉ/ अजय वाघमारे, चालक विलास पारधी यांनी बजावली आहे.

शेतकरी आंदोलनप्रश्नी चर्चा व्हायला हवी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या