सोलापूर : चाकूचा धाक दाखवत महिलेवर वर्षभरापासून अत्याचार केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकर सगरे (वय २१) याच्यावर अत्याचाराचा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिला या घरात असताना आरोपी शंकर हा त्यांच्या घरी येऊन चाकूचा धाक दाखवत फिर्यादीवर अत्याचार करत होता. शिवाय महिलेने विरोध केल्यानंतर तीच्या दोन्ही मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. ३० जून रोजी आरोपी शंकर हा पीडितेच्या घरी आल्यानंतर त्या घाबरून माहेरी आल्या. त्यानंतर त्यांनी याबाबत पतीला माहिती दिली.
त्यांनतर शुक्रवारी सायंकाळी आरोपीवर गुन्हा दाखल झाला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक मागावर रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.