पंढरपूर : कोरोनाचा वाढता प्रभाव आणि माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांनी याबाबत आदेश काढला असून, पंढरपूर शहरासह १० गावात संचारबंदीचा अंमल राहणार आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी माघी यात्रा असल्याने ,अनेक दिवसापासून भाविकांची रीघ पंढरीत लागली आहे.पुन्हा कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि या ठिकाणी भाविकांची होणारी गर्दी याबाबत येथील नागरिकांमधूनचिंता व्यक्त होत होती. मंदिर समितीने माघी यात्रेत दरम्यान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता.
असे असले तरी पंढरपूर शहरातील भाविकांची वर्दळ मोठाचिंतेचा विषय बनला होता. यात्रेदिवशी पंढरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल होतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता . अखेर याची दखल घेत जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांनी निर्णय घेतला असून, पंढरीत संचार बंदीचे आदेश दिले आहेत . १९ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा हा आदेश पारित करण्यात आला. यानुसार पंढरपूर शहरासह गोपाळपुर, वाखरी, लक्ष्मी टाकळी, कौठाळी, शिरढोण, शेगाव दुमाला,चिंचोली भोसे, भटुंबरे , गादेगाव, कोर्टी या १० गावांमध्ये संचारबंदीचा अंमल जारी करण्यात आला आहे . २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपासून २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ पर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आला आहे.
भाविकांना एसटीच्या प्रवासास प्रतिबंध करण्यात आला नसला तरी, पंढरीत आलेले भाविक मंदिरापासून सुरक्षित अंतरावर उतरतील, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पंढरपूर शहरांमधील मठांमध्ये तसेच धर्मशाळांमध्ये भाविक थांबणार नाहीत, यासाठी मठांची तपासणी करण्यात येणार आहे. एकंदरीत पंढरपूर शहरात भाविकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता प्रशासन घेणार असल्याचे सूचित होत आहे.
– कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने पंढरीतील माघी यात्रेचा धसका प्रशासनाने घेतला आहे.
– यात्रेनिमित्त येथील मठ आणि धर्मशाळामध्ये थांबण्यास भाविकांना मज्जाव करण्यात आला आहे .
– याचवेळी यात्रेदिवशी २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपासून २३फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूर शहरासह १० गावांमध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
– एकदशीदिवशी होणारी महापूजा मंदिर समितीच्या तीन सदस्य सपत्नीक प्रातिनिधिक स्वरूपात करणार आहेत.
– या दिवशी मानाच्या हभप वासकर महाराज यांच्या ंिदडीतील पाच वारकर्यांना प्रतिनिधीक स्वरूपात प्रवेश दिला जाणार आहे.