24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeसोलापूरपंढरपूर आणि परिसरात उद्यापासून संचारबंदी

पंढरपूर आणि परिसरात उद्यापासून संचारबंदी

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : आषाढी यात्रा काळात १८ ते २५ जुलै असे सात दिवस संचारबंदी पंढरपूर शहर, लगतची दहा गावे आणि श्री विठ्ठल मंदिर परिसरासाठी वेगवेगळ्या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे . येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालख्या व ंिदड्यांना पंढरपुरात प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. तथापि, मानाच्या दहा पालख्यांना ठराविक लोकांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. याच बरोबर वाखरी ते पंढरपूर प्रमुख दहा पालखीतील प्रत्येकी दोघांना पायी चालत येण्यास परवानगी आली आहे.

या मानाच्या पालख्यांचा पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात मुक्काम असणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील आणि लगतच्या दहा गावांतील लोक पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी करण्याची शक्­यता आहे. हे लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने १८ ते २५ या कालावधीत म्हणजे तब्बल आठ दिवस पंढरपूर शहर आणि लगतच्या दहा गावांत संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता. हजारो लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या आदेशाचा फेरविचार करावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि व्यापा-यांनी केली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी हजारो लोकांची मागणी आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सविस्तर आदेश काढला आहे.

पंढरपूर शहर आणि गोपाळपूर येथे १८ जुलै रोजी सकाळी सहा ते २४ जुलै रोजी दुपारी चार या काळात संचारबंदी लागू राहील. पंढरपूर शहरातील नगर प्रदक्षिणेच्या आतील बाजूच्या भागात तसेच नदीवरील सर्व घाट, वाळवंट परिसर आणि मंदिर परिसरात १८ जुलै रोजी सकाळी सहा ते २५ जुलै रोजी दुपारी चार वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. पंढरपूर शहराच्या आजूबाजूस असलेल्या भटुंबरे,चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत १८ जुलै रोजी सकाळी सहा ते २२ जुलै रोजीचे सकाळी सहा या काळातच संचारबंदी लागू राहणार आहे.

एसटी बससाठी नियमावली एसटी बस तसेच खासगी बसना १७ जुलै रोजी दुपारी दोन ते २५ जुलै रोजी दुपारी चार या काळात पंढरपूरमध्ये येण्यास व जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई केली जाणार आहे. अत्यावश्­यक सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी, मंदिर समिती पंढरपूरकडील पासधारककिंवा परवानाधारक व्यक्ती, कर्तव्यावर असणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी, आषाढी वारीकरिता शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या पालख्या व सोहळे, जीवनावश्­यक वस्तू व सेवा उदा : दूध आणि दवाखाने, औषध दुकाने, आषाढी कालावधीत पूर्वापार परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुरूप परवानगी देण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत.

अखेर त्या माय-लेकिला मिळाला न्याय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या