21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeसोलापूरपंढरपूरात संचारबंदी; जागोजागी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पंढरपूरात संचारबंदी; जागोजागी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेची आषाढी यात्रेवर सलग दुस-या ही वर्षी कोरोनाचे संकट आसल्याने हि वारी प्राथमिक स्वरुपात होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूर आणि परिसरात आठ दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे पंढरपूर आणि परिसरात जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे मंदिर परिसर आणि चंद्रभागा वाळवंटात तसेच पंढरपुर आणि परिसरात सर्वत्र निरव शांतता पहावयास मिळत आहे.

दुस-यांदा आषाढी वारीवर कोरोनाचे संकट असल्याने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आषाढी वारी सोहळा साजरा होणार आहे. यासाठी प्रमुख संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार आहेत. आषाढी वारीसाठी पंढरपुरात गर्दी होवू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आषाढी यात्रा भरली तरी गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून जिवीतहाणी होऊ नये. गर्दीमुळे चेंगरा चेंगरी होऊ नये. वारक-यांची वारी सुरक्षित व्हावी, यासाठी हजारो पोलीसांचा बंदोबस्त पंढरपुरात लावण्यात येतो. आता कोरोना संसर्गजन्य रोगामुळे आषाढी यात्रा मोजक्याच भाविकात होत आहे. तरीही पंढरपुरात गर्दी होऊ नये, यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यात हजारो पोलीसांचा बंदोबस्त लावण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली आहे.

मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भाविकांना पंढरपुरात येण्यापासून रोखण्यासाठी तीन स्तरात पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा हद्द, तालुका हद्द व शहर हद्दीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.यासाठी १७०० पोलीसांनी शहर पोलिस ठाण्यात रिपोटींग केले आहे. या सर्व पोलीस कर्मचारी व अधिका-यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये केवळ ४ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी व गावी उपचारासाठी पाठवले असल्याची माहिती विक्रम कदम यांनी दिली.

बंदोबस्तासाठी पोलीसांचे ऑनलाईन रजिस्टर
स्वेरी महाविद्यालयाने आषाढी यात्रेच्या पोलीस बंदोबस्ता ऑनलाईन पध्दतीचे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. यामध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचा-यांची नोंद होते. त्यांना या अ‍ॅपद्वारे बंदोबस्त पाँईंट, संबंधीत अधिकारी व इतर सुतना दिल्या जात आहेत. शुक्रवारपर्यंत १६०० च्या आसपास पोलीसांची नोंद कर-यात आली आहे. पुढील दोन दिवसात अणखी पोलीस यात्रेसाठी येणार असल्याची माहिती सपोनि. कपिल सोनकांबळे यांनी दिली.

लातूरच्या पुर्वभागात जोरदार पाऊस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या