21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeसोलापूरइलेक्ट्रिक शॉक लागून टिप्पर ड्रायव्हरचा मृत्यू

इलेक्ट्रिक शॉक लागून टिप्पर ड्रायव्हरचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सांगोला (विकास गंगणे) : सांगोला तालुक्यातील जवळा भोपसेवाडी या रोडचे दि.२२ नोव्हेंबर रोजी रविवार सुट्टीच्या दिवशी पीडब्ल्यूडी च्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या अनुपस्थित काम सुरू असताना टिपला विजेचा शॉक लागून टिपर चालक ड्रायव्हरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सदर घटना घडल्यानंतर या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी हेे भयभीत होवून या ठिकाणहूूून पसार झाले आहेत. घटना घडली त्या ठिकाणी ठेकेदार किंवा ठेकेदाराचे कोणत्याही कर्मचारी किंवा पीडब्ल्यूडी चे कोणतेही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

कार्तिकी यात्रेत विठ्ठलाचे मुखदर्शन राहणार बंद; विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या