23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरसोलापुरातील शाळा न्यायाधिकरण बंद करण्याचा निर्णय स्थगीत

सोलापुरातील शाळा न्यायाधिकरण बंद करण्याचा निर्णय स्थगीत

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापुरातील शाळा न्यायाधिकरण बंद करण्याचा शिक्षण आणि क्रीडा विभागाचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यालयाने दिली आहे.

सोलापुरात उस्मानाबाद आणि नगर या जिल्ह्याचे शाळा न्यायाधिकरण गेली अनेकवर्ष सुरु आहे. मात्र अलिकडेच हे न्यायाधिकरण बंद करण्याचा आदेश निघाला होता. या संबंधात आमदार प्रणिती शिंदे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र देवून व भेटून न्यायाधिकरण बंद न करण्याविषयी विनंती केली होती.

सध्यस्थितीत १५० अपिले या न्यायाधिकरणाकडे प्रलंबित आहेत. तर रोज तिन्ही जिल्ह्यातून मिळून १५ हून अधिक अपिल दाखल होतात. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी प्रणिती शिंदे यांच्या पत्राची दखल घेवून हा निर्णय स्थगित ठेवण्याबाबत संबंधितांना आदेश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या