25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeसोलापूरदसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

एकमत ऑनलाईन

पंढरपूर – दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात झेंडूंच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा अधिकच खुलून दिसत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रत्येक राष्ट्रीय आणि सांस्कृतिक सणांच्या दिवशी विठ्ठल मंदिरात विविध रंगीबिरंगी फुलांची आणि फळांची आरास केली जाते. विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी झेंडूंच्या फुलांचे आणि आपट्याच्या पानांचे आधिक महत्व असते. यामुळे आज विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात आणि गाभाऱ्यात झेंडूची फुले आणि आपट्यांच्या पानांची आकर्षक मनमोहक सजावट करण्यात आलेली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी विठ्ठल भक्तांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.विजयादशमी दसऱ्यानिमित्तच्या विठ्ठल भक्तांना आपल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाचा योग घडवला आहे.

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या