28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home सोलापूर माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे केविड ऑक्सिजन उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा

माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे केविड ऑक्सिजन उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा

एकमत ऑनलाईन

अकलूज : माळशिरस सरकारी ग्रामीण रुग्णालय येथे केविड ऑक्सिजन उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये रविवार संपन्न झाला.

मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये पहिले ग्रामीण सरकारी रुग्णालय आहे त्यामध्ये केविड ऑक्सिजन उपचार केंद्र असणार आहे सदर रुग्णालयांमध्ये 30 ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

ग्रामीण रुग्णालय माळशिरस केविड ऑक्सिजन उपचार केंद्र लोकार्पण सोहळ्यास रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, माळशिरस च्या नगराध्यक्षा सौ द्रोपदी देशमुख, उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील, अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुप्रिया खडतरे, माळशिरस ग्रामीण रुग्णालयाचे सुप्रीडेंन्ट डॉक्टर श्रेनिक शहा, माळशिरस पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी शिवाजीराव पाटील, रुग्ण कल्याण समिती सदस्य रामदास काळे ,शौकत पठाण, वस्ताद विजयराव देशमुख ,डॉक्टर स्मिता शिंदे डॉक्टर निखिल मिसाळ डॉक्टर राहुल गावडे माळशिरस मेडिकल असोसिएशन अ‍ॅन्ड ड्रगिस्टचे सदस्य निमा डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्यासह नर्स, कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाची सौम्य लक्षणे असणा-या व्यापा-यांना गृहविलगीकरणाची मुभा द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या