21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeसोलापूरजगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवरती कारवाईची मागणी

जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवरती कारवाईची मागणी

एकमत ऑनलाईन

करकंब : करकंब तालुका पंढरपूर येथील जगताप मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल वर भाजप, शिवसेना, मनसे, बहुजन ब्रिगेड, यांनी हॉस्पिटलमधील घडत असलेल्या गैरप्रकार व भरमसाठ आवाजावी बिल संदर्भात तसेच सदर जगताप हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. पांडुरंग बलभीम जगताप हे आयुर्वेदिक (एमडी) असताना अ‍ॅलोपॅथिक व कोविड उपचार चुकीच्या पद्धतीने करण्याचे धाडस करून रुग्णांच्या जीवाशी खेळतात.

डॉक्टर जगताप यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बाहेरील डॉक्टरांचे संमती पत्र घेऊन त्यांच्या नावाचा वापर करून कोविड हॉस्पिटल चालु केले. मात्र शासनाच्या नियमावलीनुसार एकाही नियमाचे पालन केले जात नाही covid-19 हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षित डॉक्टरांची आवश्यकता असताना सुद्धा ते एकटेच डॉक्टर व अशिक्षित कर्मचारी यांना सोबत घेऊन चुकीच्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करतात त्यामुळे covid-19 हॉस्पिटल सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत चुकीच्या उपचार पद्धतीने अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. शासनाच्या नियमापेक्षा दुप्पट ते तिप्पट दर आकारुन बिले घेतली जाते व बिलाची कोणत्याही प्रकारे पावती रुग्णांना दिली जात नाहीत.

covid-19 हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आजतागायत पर्यंतचे आलेले रुग्ण संख्या व त्या रुग्णांना दिलेली ओरिजनल बिले यांची सखोल चौकशी करावी तसेच स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी covid-19 रुग्णांकडून अवाजवी बिले घेणे शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा बनावट पद्धतीने चुकीचे उपचार करणे यामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्यामुळे सदर डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व सदर जगताप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल च्या सेंटर रुग्णालयाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. अशी विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा – ना. अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या