28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeसोलापूरराम मंदिर पायाभरणी करीता वटवृक्षाखालील मातीचे अयोध्येस प्रस्थान

राम मंदिर पायाभरणी करीता वटवृक्षाखालील मातीचे अयोध्येस प्रस्थान

एकमत ऑनलाईन

अक्कलकोट : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या अयोध्यातील श्री राम मंदिराची पायाभरणी येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत संपन्न होत आहे. या शुभ कार्याकरीता श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीच्या वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाखालील माती ही या राम मंदीराच्या पायाभरणीसाठी स्वामी समर्थांचा आशिर्वाद म्हणून पाठविण्यात आली.

अक्कलकोटच्या श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश लोणारी, मंदार पुजारी व श्रीराम संस्थेचे सर्व पदाधिकारी व रामभक्त यांच्या हस्ते अयोध्येस जाणा-यांकडे ही वटवृक्षाखालील माती प्रस्थानाकरीता सुपूर्द करण्यात आली. येत्या ५ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते या मंदिर पायाभरणीचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न होत आहे.

तमाम ंिहदू धर्माकरिता व ंिहदू धर्माच्या आध्यात्मिक संप्रदायकरीता हा एक अभिमानास्पद क्षण आहे. या शुभ कार्यास स्वामी समर्थाचे आशिर्वाद लाभावे या उद्देशाने आम्ही श्रीराम संस्थेचे सर्व पदाधिका-यांनी हा उपक्रम राबविला आहे अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी श्रीराम संस्थेचे योगेश पवार, सचिन कलबुर्गी, शेखर ंिझगाडे, शिवकुमार स्वामी, अतिश पवार, अनंत क्षीरसागर, चैतन्य शिंदे, प्रितम आळंद, सचिन गिरबोणे, नरेगल, महेश काटकर, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, महेश मस्कले, सिद्धार्थ थंब, सागर लोणारी व रामभक्त उपस्थित होते.

Read More  तिन पॉझिटीव्ह निघताच गोरेगावकरांची धाकधुक वाढली

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या