25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरनुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

एकमत ऑनलाईन

करकंब : बेदाणा शेड वरील कागद वा-याने फाडून गेल्याने बेदाणा भिजून मोठे नुकसान झाले आहे. करकंब, बार्डी येथील अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्षे, बेदाणा शेडची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. करकंब, बार्डी व जाधववाडी परिसरातील द्राक्ष, डांिळब, बेदाणा, झाडे व घराचे पत्रे वादळी वा-याने पडझड झाली होती. करकंब येथील दिलीप व्यवहारे, राहुल शिंगटे, तर बार्डी येथील दिनकर कवडे, राहुल बनकर यांच्या द्राक्ष बागेची व बेदाणा शेड ची अजितदादा पवार, आ संजय मामा शिंदे, कल्याणराव काळे यांनी पाहणी केली, यावेळी पं स सदस्य राहुलकाका पुरवत, उपसरपंच आदिनाथ देशमुख, शरद पांढरे, ग्रा प सदस्य पांडुरंग नगरकर, मुस्तफा बागवान, बापूराव शिंदे, संतोष धोत्रे आदी उपस्थित होते.

येथील प्रभाकर व्यवहारे व शेतक-यांनी पिकविम्याप्रमाणे बेदाणा शेड ला विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केली. आचारसंहिता असल्याने कोणतीही घोषणा करता येत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, त्यामुळे पंचनामे करून घ्यावेत, आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. पं स सदस्य राहुल काका पुरवत यांनी अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळींब, बेदाणा व पर्त्याच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान ग्रस्तांना भरीव मदत मिळावी यासाठी अजित पवार यांनी निवेदन दिले.

दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्री केजरीवालांची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या