34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeसोलापूरवाळू तस्करांच्या बोटी नष्ट

वाळू तस्करांच्या बोटी नष्ट

एकमत ऑनलाईन

करमाळा : करमाळा तालुक्यातील कुगाव येथे उजनीच्या जलाशयात बेकायदेशीर पणे बोटीच्या साहाय्याने वाळू चोरी करताना पाच जणांना त्यांच्याकडून 12 लाख रुपयांच्या दोन फायबर बोटी व 1 लाख रुपयांची वाळू पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आल्या. उजनीच्या जलाशयात दोन यांत्रिक फायबरच्या बोटीच्या साहाय्याने वाळू चोरी करत असल्याचे माहिती कळल्यावर दि 5 रोजी पहाटे 2 वा त्याठिकाणी छापा टाकला असता 12 लाख रुपयांच्या दोन बोटी व 1 लक्षरुपयांची वाळू 12 ब्रास वाळू सापडली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी या बोटीचा व वाळूचा पंचनामा करून बोटी वाळू सहित पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आल्या. याप्रकरणी मफजुल शेखमहेबूब शेख, रफिक हुल शेख,माबुत शेख रा सर्व (अकुलब झारखंड) तर पहिल्या बोटीचे मालक पांडुरंग प्रल्हाद मोरे (रा चिखलठाण) ता करमाळा, दुस-या बोटीचे मालक हनुमंत रेडके (रा कालठण न 1)ता इंदापूर या सर्वांवर वाळू चोरी व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री सुनील जाधव करत आहेत.

मार्ग काढावाच लागेल!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या