22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeसोलापूरधनगर समाज मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखणार

धनगर समाज मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखणार

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गी लावावा. यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा ठराव घेण्यात यावा. अन्यथा आषाढी एकादशीची श्री विठ्ठलाची महापूजा मुख्यमंर्त्यांच्या हस्ते होऊ दिली जाणार नाही अशी भूमिका पंढरपूर येथील धनगर समाजाच्या बैठकीत घेण्यात आली असल्याचे धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपुरकर यांनी सांगितले. यावेळी परमेश्वर कोळेकर, डॉ. मारुती पाटील, शालिवाहन कोळेकर, संतोष सुळ, संतोष बंडगर,संजय माने, संतोष शेंडगे, पांडुरंग चौगुले, अण्णा सलगर उपस्थितीत होते.

सध्या राज्यात मराठा आरक्षणसाठी मोठे आंदोलन उभे केले जात आहे. यामध्ये संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी पुढाकार घेतला आहे. धनगर आरक्षणाबाबत आम्ही लवकरच दोन्ही छत्रपतींना भेटून मराठा आरक्षण बरोबरच धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करणार असल्याचे येथील धनगर बांधवांनी सांगितले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे.

अनेक वर्षांपासून धनगर समाजास आरक्षण देण्यास राज्यकर्त्यांनी टाळाटाळ केली आहे. सत्तेवर येण्याअगोदर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले होते. मात्र सत्तेवर येऊनही धनगर समाजाचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. यामुळे पंढरपुरात महापूजेसाठी येण्याअगोदर मुख्यमंर्त्यांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा आषाढी एकादशीची श्री विठ्ठलाची महापूजा करण्यापासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रोखणार असल्याचे भूमिका पंढरपूर येथील धनगर समाजाच्या बैठकीत घेण्यात आली.

कोरोना नसताना लागण झाल्याचा अहवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या