37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसोलापूरधनगर समाजाच्या वतीने ढोल बजावो आंदोलन

धनगर समाजाच्या वतीने ढोल बजावो आंदोलन

एकमत ऑनलाईन

अकलुज : गेल्या दहा महीन्या पासून महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत कसलेही पाऊल सरकारने उचलले नाही. समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहीजे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेले एक हजार कोटींचा निधी तात्काळ वितरीत करावा व महाराष्ट्रा सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असे म्हणत या आंदोलनास माझा व भारतीय जनता पार्टीचा पाठींबा आहे असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर ढोल बजाव सरकार जगाव हे आंदोलन धनगर समाजाच्या वतीने माळशिरस येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

मोहिते पाटील पुढे म्हणाले यावेळी अनेक दिवसांपासून धनगर समाज या आरक्षण अंमलबजावणी साठी संघर्ष करत आहेत धनगर समाजाला जो भटका आहे जो भटकंती करून जीवन जगत आहे त्यास आरक्षणामुळे मुख्यप्रवाहात सामिल करण्यासाठी न्याय प्रयत्न केला पाहिजे याच सोबत मराठा आरक्षणाचा तिढा देखील राज्य सरकारने सोडवला पाहीजे. या वेळी आंदोलनकर्त्यांनी राज्यसरका कुंभकर्णाप्रमाणे झोपा घेत आहे शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवला पाहीजे न्याय दिला पाहिजे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठीच हे आंदोलन आहे असे सांगितले.

आंदोलनकर्ते धनगरी वेषात घोंगडी, काठी,फेटा,परीधान करून आले होते या वेळी बाळासाहेब वावरे, बाळासाहेब सरगर, अ‍ॅड मदने,ट्योळे, काका नरवणे व इतर धनगर समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या