25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरजिल्हाधिका-यांचे थेट प्रधान सचिवांना साकडे

जिल्हाधिका-यांचे थेट प्रधान सचिवांना साकडे

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जिल्ह्यात दररोज ४० रुग्ण कोरोनाचे बळी ठरत असून सरासरी दोन हजार रुग्ण नव्याने वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण २४ लाख सात हजार ९०१ व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्े पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी, असे पत्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी थेट सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना लिहिले आहे.

सोलापूर शहरात कडक संचारबंदीच्या १७ दिवसात चार हजार ६१६ रुग्ण वाढले असून २४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात १८ हजार ८६१ रुग्ण वाढले अस्ून २८ रुग््णांच मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, परंतु वाढणा-या मृत्यूदरामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, मागणीच्या प्रमाणात रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नाही. जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाखांपर्यंत असतानाही केवळ २१५ व्हेंटीलेटर आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ६० डॉक्टरांच्या भरतीची दोनदा जाहिरात देऊनही डॉक्टर मिळत नसल्याची स्थिती आहे.

दररोज अ‍ॅक्टिव्ह रुग्ण वाढत असून सध्या साडेचौदा हजारांवर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागावरील ताण वाढला असून ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड वेळेत मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची स्थिती सुधारण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय दिसत आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक यांना पत्र पाठवूनही लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापतींनीही नुकतेच त्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपल्या स्तरावरून लसीचा कोटा वाढवून मिळावा, अशी विनंती पत्रातून जिल्हाधिका-यांनी केले आहे.

जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील १६ लाख ७९ हजार ६८८ तर ४५ वर्षांवरील १३ लाख ९९ हजार ७२९ व्यक्तींना लस टोचण्याचे उद्दिष्टे आहे. आतापर्यंत फ्रंटलाईनवरील वर्कर, वैद्यकीय अधिका-यांना व कर्मचा-यांसह ४५ वर्षांवरील दोन लाख ६६ हजार ३०४ व्यक्तींनाच पहिला डोस टोचण्यात ल्आाा आहे. त्यातील अवघ्या ४४ हजार व्यक्तींनाच दुसरा डोस मिळाला आहे. मात्र एक लाखांपर्यंत व्यक्तींनी पहिला डोस घेऊन ५० दिवसांहून अधिक कालावधी पूर्ण केला आहे. तरीही त्यांना दुसरा डोस मिळत नसून त्यांचे हेलपाटे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

घरफोडी गुन्ह्यातील आरोपींना अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या