25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeसोलापूरदौंडमधून साडेआठ हजार क्­युसेक्सचा विसर्ग

दौंडमधून साडेआठ हजार क्­युसेक्सचा विसर्ग

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाने आता प्लसकडे वाटचाल सुरू केली आहे. मायनस 22 टक्­क्­यांपर्यंत गेलेली पाणी पातळी आता मायनस तीन टक्­क्­यांपर्यंत आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रातील पावसामुळे पुढील काही आठवड्यात उजनी धरण प्लसमध्ये यईल, अशी माहिती सोलापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

सोलापूर शहरासाठी व जिल्ह्यातील शेतक-यांसाठी दरवर्षी उजनीतून पाणी सोडले जाते. धरणामुळे जिल्ह्याला अनेकदा दुष्काळाच्या छळा पोचलेल्या नाहीत. रब्बीचा जिल्हा आता खरिपाकडे वाटचाल करताना त्यात उजनीचा मोलाचा वाटा राहिला आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 39 साखर कारखाने उभारले आहेत. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यातून ग्रामीण अर्थकारणही बदलले आहे. पुणे जिल्ह्यासाठीही हे धरण तितकेच महत्त्वाचे ठरले असून, अनेक उद्योगांना धरणातून पाणी दिले जाते. शेती विकासात आणि उद्योगवाढीत धरणाचे मोठे योगदान आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पावसापेक्षाही पुणे जिल्ह्यातील पावसामुळे अनेकदा धरण शंभर टक्­के भरले आहे. पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे.

सध्या दौंडमधून आठ हजार 791 क्­युसेकने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांत धरण प्लसमध्ये येईल आणि पावसाळा संपेपर्यंत धरण शंभर टक्­के भरेल, असा विश्­वासही साळे यांनी या वेळी व्यक्­त केला. त्यामुळे आगामी वर्षभरातील पाण्याची गरज पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

मेहमूद : हुकमी विनोदवीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या