24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeसोलापूरदंडात्मक कारवाईमुळे विडी उद्योजकात नाराजी

दंडात्मक कारवाईमुळे विडी उद्योजकात नाराजी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरातील विडी कामगारांची टप्प्याटप्प्याने कोरोना चाचणी करण्याचे ठरले असतानाही कोरोनासंदर्भातील पथकाकडून विडी कारखानदारांना दंडाची सक्ती केली जात आहे. शनिवारी एका कारखान्याला चक्क एक लाख १० हजार रुपयांचा दंड करण्याचा प्रयत्न पथकाने केला. मात्र ही कारवाई जाचक असल्याचे सांगत कारखान्याने दंड भरण्यास नकार दिला.

अन्य कामगारांप्रमाणे विडी कामगारांनाही कोविड चाचणी वा लसीकरण सक्तीचे आहे. मात्र या कामगारांची संख्या सुमारे ५० हजार असल्याने त्यांची एकाचवेळी चाचणी करण्यासाठी यंत्रणा तोकडी पडणार असा मुद्दा गत आठवड्यात उपस्थित झाला होता. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे व महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांची गेल्या रविवारी सोलापूर विडी उद्योग संघासमवेत बैठक झाली. त्यात महापालिकेकडून शहरातील विडी कारखान्यांच्या १३० शाखांमध्ये टप्प्याटप्प्याने कोरोना चाचणीचे शिबिर घेण्याचे ठरले.

आतापर्यंत केवळ सहा शाखांमध्ये शिबिरे झाली. उर्वरित शाखांमध्ये शिबिरे झाली, उर्वरित शाखांमध्ये शिबिर घेण्याचे नियोजन महापालिकेने केले नाही. शिबिर घेईपर्यंत कामगारांना कोविड चाचणीशिवाय काम देण्यास कारखान्यांना मुभा असतानाही कोविड प्रतिबंधक पथकांकडून कारखानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे.

शनिवारी पद्मशाली चौकातील साबळे-वाघिरे कंपनीच्या शाखेत पथकाने सर्व रेकार्ड तपासले. महापालिकेतर्फे शिबिर झाले नसतानही या शाखेतील २०७ पैकी ९७ कामगारांनी स्वत:हून मनपाच्या आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करून घेतली असून उर्वरित ११० जणांची चाचणी शिल्लक आहे. ही माहिती समोर आल्यावरही पथकाने प्रत्येक कामगाराला एक हजार या प्रमाणे एक लाख १० हजार दंड भरण्याची सक्ती केली. यावर कारखान्याच्या व्यवस्थापनाने आम्हाला शिबिर होईपर्यंत दंड लागू होत नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र पथक ऐकण्यास तयार नव्हते. यावर महापौर श्रीकांचना यन्नम व कामगार नेते नरसय्या आडम यांनी हस्तक्षेप करून पथकाला समजाविण्याचा प्रयत्न केला. शेवटी पथकाने नरमाईची भूमिका घेत आठ दिवसांत उर्वरित कामगारांची कोरोना चाचणी करण्याचे फर्मान सोडले. प्रशासनाची ही कारवाई चुकीची असून, अन्य विडी कारखान्यांदेखील दंडासाठी जाच होऊ शकतो, असे सोलापूर विडी उद्योग संघाचे म्हणणे आहे.

कच्चे तेल स्वस्त; दरवाढ जबरदस्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या