29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeसोलापूरसरसकट शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी

सरसकट शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
कोरोना संकटामुळे राज्यात शाळा, महाविद्यालये सरसकट बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रामीणभागात पटसंख्या कमी असणे, एकाच गावातील विद्यार्थी शाळेत असतात.ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णसंख्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याबाबत शासनाने आणि प्रशासनावर निर्णय सोडावा, अशी मागणी पालकांमधून होत आहे. शहरी भागातही सोशल डिस्टिसिंगचे पालन करून शाळा सुरु ठेवता येवू शकतात. मात्र त्यासाठी शासनाच्या व प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

नवीन वर्षाच्या प्रारंभीपासूनच राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस बादत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात मिनी लॉकडाउन लागू केला आहे. त्याअंतर्गत दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चित्रपटगृहे नाट्यगृहे खासगी कार्यालये हे ५० टक्के क्षमतेने तर हॉटेल्स, मॉल यांना ठरावीक वेळेपर्यंत सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. घेण्यात आला आहे. या काळात विद्याथ्यांचे मात्र जिल्ह्यातील सर्वच शाळा ऑनलाइन शिक्षण प्रणाली यळता सरसकट बंद करण्याचा निर्णय राबविण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे पालकांसह शिक्षकांमध्येसुध्दा नाराजी पसरली आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था बंद झाली. परिणामी विद्याथ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. आता कुठे शाळा सुरू झाल्या होत्या. आता कोरोनाच्या तिस-या लाटेमुळे शाळेबाबत लॉकडाउनचा निर्णय शासनाने जारी केला आहे. शाळा बंद पडल्यामुळे विद्यार्थी सर्व काही विसरत आहेत.

यामुळे त्यांच्या भवितव्याबाबत पालकांचा जीव भांडयात पडला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी शाळा सरसकट बंद न ठेवता ज्या परिसरात रुणसंख्या कमी आहेकिंवा शून्य आहे अशा भागात शाळा प्रत्यक्ष ठेवून शैक्षणिक नुकसान येईल, असेही पालकांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या