27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरएक रुपया प्रति लिटरप्रमाणे पेट्रोलचे वाटप; आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम

एक रुपया प्रति लिटरप्रमाणे पेट्रोलचे वाटप; आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम

एकमत ऑनलाईन

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना केवळ एक रुपया प्रति लिटरप्रमाणे पेट्रोलचे वाटप करण्यात आले.

सोलापुरातल्या डॉ. आंबेडकर स्टुडंट्स आणि युथ पँथर्स या संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. सोलापुरात आज पेट्रोलचा दर १२०.१८ रुपये आहे. सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोलचे दर हे १२० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाचशे नागरिकांना एक रुपयाप्रमाणे पेट्रोल देत बाबासाहेबांना अभिवादन करत असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली.

अवघ्या एक रुपयात पेट्रोल मिळत असल्याने पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी झाली होती. भली मोठी रांग यावेळी पेट्रोल पंपाच्या समोर दिसून आली. मात्र यातील पाचशे नागरिकांना प्रति एक लिटरप्रमाणे पेट्रोल वाटप संघटनेच्या वतीने करण्यात आले.

दरम्यान महागाई वाढलेली असताना आमच्यासारखी छोटी संघटना पाचशे लोकांना पेट्रोल वाटप करून दिलासा देऊ शकते तर सरकारने देखील नागरिकांना दिलासा द्यावा, असा उद्देश या उपक्रमामागे असल्याची भावना डॉ. आंबेडकर स्टुडंट्स आणि युथ पँथर्स संघटनेचे अध्यक्ष महेश सर्वगोड यांनी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या