सोलापूर : तुला डोळ्यांचा गंभीर आजार आहे. तुझ्यापासून जन्माला येणारी संततीही आंधळी जन्माला येतील, असे म्हणत डॉक्टर पत्नीला बेडरूममध्ये कोंडत व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सहाजणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत स्वाती धनराज करचे (वय २८, रा. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी स्वाती करचे यांचा विवाह आरोपी पती धनराज किसन करचे यांच्याशी २०२१ मध्ये झाला. लग्नानंतर काही दिवसांनी तुला डोळ्यांचा गंभीर आजार आहे. त्या आजारावर इलाज अशक्य आहे. तू पुढे जाऊन आंधळी होशील. तुझ्यापासून होणारी संततीदेखील आंधळी जन्म घेईल, असे म्हणत स्वाती यांना हाताने व काठीने लाथाबुक्क्यानी मारहाण केली, तसेच स्वाती यांनी माझ्याकडे बीएचएमएस कोर्स केल्याने कुठे तरी नोकरी करेन असे म्हटल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी विरोध करीत त्यांना बेडरुममध्ये कोंडले, अशा आशयाची फिर्याद स्वाती करचे यांनी दिली. या फिर्यादीवरून पती धनराज, सासरे किसन दगडू करचें, सासू शर्मिला किसन करचे दीर महेश किसन करचे, स्नेहल महेश करचे, संगीता नाना करचे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.