29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeसोलापूरडॉक्टरांचे तीस लाख रुपये ट्रेझरीमध्ये

डॉक्टरांचे तीस लाख रुपये ट्रेझरीमध्ये

एकमत ऑनलाईन

सोलापूर : तुळजापूर रोडवरील एका कारमधून निनावी मोठी रक्कम जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी एक संशयित कार अडवली. त्यात पोलिसांना २९ लाख ५० हजार रुपये आढळले. ही रक्कम शहरातील एका नामांकित मेंदूविकार डॉक्टरांची असल्याचे बोलले जात होते. ही रक्कम जोडभावी पेठ पोलिसांनी ट्रेझरीमध्ये जमा केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांना या कारबाबतची . कुणकुण लागली. यामुळे पोलिसांनी लगेच बंदोबस्त लावत कारवाई केली. त्या गाडीमध्ये एका बॅगेत पाचशेच्या व दोन हजारांच्या नोटा आढळल्या. बॅगेतील नोटा इतर साहित्याने झाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत पोलीसांनी कारचालक व त्यातील एका सहका-याला विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे पोलिसांनी लगेच याबाबत आयकर विभागाला माहिती दिली. त्यानंतर शनिवारी ही रक्कम ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आली. या प्रकरणी आयकर विभागाकडून तपासणी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या