पंढरपूर : माघी वारीसाठी पंचमीपासूनच पंढरपुरातील मठा मठामध्ये वारकरी दाखल झाले आहेत. वारक-यांना मठा बाहेर काढण्याचे प्रयत्न करू नये. वारकरी संतापतील अशी कोणती अॅक्शन शासनाने घेऊ नये. पोलिसांनी वारक-यांच्या बाबतीत आपली भूमिका सौम्यच ठेवावी. उद्या कदाचित आम्ही मठातील सर्व वारकरी पंढरपुरामध्ये एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर तो शासनाच्या अंगलट येईल असा इशारा ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
पुढे कराडकर म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या चार प्रमुख वा-या आहेत. आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री आहे. त्यापैकी माघी वारी चालू आहे. समाजाच्या आरोग्याची दक्षता घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. हे आम्हाला मान्य आहे. परंतु त्याचबरोबर पंचमी, शष्टी पासून प्रत्येक मठामध्ये वारकरी येऊन राहीले आहेत. त्या वारक-यांना पोलीस मठातून उसकाऊन बाहेर काढत असतील तर ते योग्य नाही. कोरोनाची काळजी घेतली पाहीजे. याबाबत कोणतेही दुमत नाही. परंतु आपल्याला संचारबंदी करायचीच होती तर, पंचमीपासून वारक-यांना पंढरपुरात येऊच द्याच नव्हत. वारकरÞयांचा प्रक्षोभ होईल अशी कृती पोलिसांनी करू नये. अन्यथा वारकरी बाहेर पडले तर सरकारांच्या अंगलट येईल असा थेट इशारा ह. भ. प. बंडा तात्या कराडकरांनी दिलाय.
एकेचाळीस वषार्पासून आमराबाद ग्रा.पं. निवडणूक बिनविरोध