23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरसोलापुरात परिचारिकांच्या संपामुळे सिव्हीलमधील रूग्णसेवा सलाईनवर!

सोलापुरात परिचारिकांच्या संपामुळे सिव्हीलमधील रूग्णसेवा सलाईनवर!

एकमत ऑनलाईन

सोलापूर : गुरुवारपासून परिचारिका संपावर गेल्याने सिव्हिलमधील रुग्णसेवाच सध्या सलाईनवर आहे. परिचारिकांच्या काम बंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला बसला आहे. परिचारिकांची कामे डॉक्टरांना करावी लागत आहेत. ब्रदर्सवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच रुग्णांची स्ट्रेचरवरून ने-आण करणे व इतर कामे रुग्णांच्या नातेवाइकांनाच करावी लागत असल्याचे चित्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिसून आले.

शासनाने कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे, ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी २३ मेपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यात आंदोलनास सुरवात झाली आहे. परंतु, शासन दाद देत नसल्याने २६ व २७ मे रोजी दोनदिवसीय राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात आले. तरीही शासनाने दखल न घेतल्याने परिचारिकांनी शनिवार (दि. २८) पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

यामुळे रुग्णसेवा कोलमडली असून, डॉक्टरांची धावपळ होताना दिसत आहे. शंभर टक्के मागण्या होईपर्यंत कामावर हजर होणार नाही, असा पवित्रा परिचारिकांनी घेतला आहे.

आंदोलनात ४०० परिचारिका
सिव्हिल रुग्णालयात ७५० बेडची सुविधा आहे. यासाठी परिचारिकांच्या मंजूर पदांची संख्या ५८६ आहे. यातील २१० पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक कारणांसाठी काही परिचारिका सुटीवर आहेत. सिव्हिलमधील ३०० व विमा हॉस्पिटलमधील १०० अशा ४०० परिचारिका बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी आहेत. तीन शिफ्टमध्ये परिचारिकांचे काम चालते. परिचारिकांना सकाळी व दुपारच्या शिफ्टमध्ये आठ तास काम करावे लागते तर रात्रपाळीत १२ तास काम करावे लागत असल्याचे यावेळी परिचारिकांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या