19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसोलापूरवालवडमधील दलित बांधवांना रस्त्याचा मार्ग मोकळा दैनिक एकमतच्या बातमीचा इफेक्ट

वालवडमधील दलित बांधवांना रस्त्याचा मार्ग मोकळा दैनिक एकमतच्या बातमीचा इफेक्ट

एकमत ऑनलाईन

बार्शी (प्रतिनिधी): वालवड गावातील १५ वर्षे जूना वाद अखेर संपुष्टात आला.यावेळी तहसीलदार किरण जमदाडे यांना सदरील उपोषण मार्गी लावण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.यावेळी उपोषणकर्त्यांना तहसीलदार जमदाडे यांनी नारळाचे पाणी देऊन मागण्या मान्य करत उपोषण सोडायला लावले.

सदरील गावातील रोड आणि स्मशानभूमिचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बसपाचे प्रसन्नजीत नाईकनवरे,रिपाइंचे सनी गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते धीरज भोसले यांनी हा प्रश्न शेवटपर्यंत लावून धरून तडीस लावला.यावेळी दैनिक एकमतने हा प्रश्न सतत लावून धरून प्रशासनाला धारेवर धरले व शेवटपर्यंत पाठपुरावा केल्यामुळे वालवड गावातील ग्रामस्थ व पक्ष,संघटनांनी आभार मानले.तसेच गावातील स्थानिक पुढारी सुधीर जाधवर यांच्या पुढाकारानेही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी अर्जुन जाधवर,धनाजी जाधवर,रमेश जाधवर यांचेही सहकार्य केल्यामुळे ग्रामस्थ आणि दलित पक्ष,संघटनेकडून आभार मानण्यात आले.तसेच ग्रामस्थ आणि वंचित आघाडी,बसपा आणि रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी तहसीलदार जमदाडे,गटविकास अधिकारी शेखर सावंत,नायब तहसीलदार संजीवन मुंडे,सपोनि राजकुमार यावलकर,गोपनियचे बाळासाहेब नाईकनवरे,पोना अभय उंदरे यांचेही यावेळी आभार मानण्यात आले.यावेळी आबा बोकेफोडे,बामसेफचे तानाजी बोकेफोडे,रिपाइंचे धीरज कांबळे,जय शिरामे आदी उपस्थित होते.

कृषीविधेयकाचे रयत क्रांती संघटनेच्या वतीने गुढी उभा करून समर्थन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या