22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरअकलूज मध्ये आठ दिवसाचा जनता कर्फ्यु

अकलूज मध्ये आठ दिवसाचा जनता कर्फ्यु

एकमत ऑनलाईन

अकलूज(कृष्णा लावंड) कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे अकलूज यशवंनगर व संग्रामनगर बया गावात शनिवार दि. ११ सप्टेंबर ते शुक्रवार दि.१८ सप्टेंबर दरम्यान आठ दिवसाचा कडकडीत जनता कर्फ्यु लावण्याचा व्यापारी, सामाजिक व सेवाभावी संघटनांच्यावतीने निर्णय घेण्यात आला असुन सर्वांच्या सहमतीने प्रांताधिकारी शमा पवार यांनी दुध व औषधे या अत्यावश्यक सेवा वगळता वरील  सर्व गावात कडकडीत बंद ठेवुन आठ दिवसाचा जनता कर्फ्यु जाहीर केला

अकलुज व परीसरात कोरोनाच्या विळाख्याने रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे.या गंभीर विषयावर निर्णय घेण्यासाठी अकलुज व परिसरातील व्यापारी,सामाजिक व सेवाभावी संघटनांची  प्रांताधिकारी शमा पवार यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक संपन्न झाली.या बैठकीत कोरोना साखळी तोडण्यासाठी ११ ते १८ सप्टेंबर दरम्यान कडकडीत जनता कर्फ्यूचा  निर्णय घेतला.यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील,गट  विकास अधिकारी स्मिता पाटील,शिवरत्न व डाॅटर्स माॅम फौंंडेशनच्या अध्यक्षा  शितलदेवी मोहिते पाटील,सुनंदा फुले,पं.सं.सदस्या हेेेमलता चांडोले,माजी सदस्या फातिमा पाटावाला,पो.नि.भगवानराव निंबाळकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते,आय.एम.ए चे अध्यक्ष डाॅ. नितीन एकतपुरे,विविध व्यापारी असो.चे पदाधिकारी सामाजिक व सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

अकलूज यशवंनगर व संग्रामनगर येथे दैनंदिन कोरोना बाधित रुग्णात वाढ होत आहे.अकलूज येथे ४६१ यशवंतनगर येथे ११६ तर संग्रामनगर येथे ७८ रूग्ण आढळले आहेत.कोरोना रूग्णांची साखळी शोधने,टेस्ट घेणे व विलगीकरण करणे गरजेचे असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन करणे गरजेचे आहे असे मत प्रांताधिकारी शमा पवार यांनी व्यक्त केले.तर शितलदेवी मोहिते पाटील यांनी मागील जनता कर्फ्यूचा कोरोना रोखण्यासाठी फायदा झाला.पण अनलाॅकमुळे सर्व विस्कळीत झाले.आता पुन्हा जनता कर्फ्यु लावणे आवश्यक असल्याचे सांगितले.त्यावर उपस्थित व्यापारी असो.चे प्रतिनिधींनींनी ८ दिवस कडक बंद पाळण्याचा निर्णय घेतला.याकाळात फक्त दुध व औषधांची दुकाने उघडी राहतील.इतर सर्व बंद राहील असे जाहिर केले.

देशातील प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहे-यशवंत सिन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या