19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूरवृद्धावर चाकूहल्ला

वृद्धावर चाकूहल्ला

एकमत ऑनलाईन

सोलापूर : ‘तुला फार मस्ती आली आहे. तुला आता जिवंत सोडत नाही’, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांना वळसंग पोलिसांनी अटक केली.

मशाक महिबूब बागवान (वय ७८, रा. संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी पोलिसात याविषयी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शरणाप्पा शिवप्पा कोळी (वय ५८), रवी तुकाराम बागले (वय २६), बनसिद्ध पंडित उर्फ भीमा गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. सिद्धाप्पा उर्फ सिद्धू अर्जुन बनसोडे याला अद्याप

अटक करण्यात आलेली नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रामपूर (ता. द. सोलापूर) शिवारातील फिर्यादी मशाक बागवान यांच्या शेता शरणाप्पा, रवी, बनसिद्ध व सिद्धाप्पा या चौघांनी संगनमत करून त्या महिलेबाबत तुला काय करायचे आहे, गप्प बस नाहीतर तुला तुझी शेती खाऊ देणार नाही, असे म्हणून ते भांडण मिटवतो असे म्हणत शेतात आले याचवेळी सिद्धाप्पा याने फिर्यादी मशाक बागवान यांना ‘तुला फार मस्ती आली आहे, तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून कमरेजवळ ठेवलेला लोखंडी चा कूकाढून जीवे मारण्याच्या उद्देशान त्यांच्या पोटावर डाव्या बाजूला मारून गंभीर जखमी केले. या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या