सोलापूर : सलगरवस्ती, भैरू वस्ती परिसरात एका घरात वृध्द महिला पडून जखमी होऊन मरण पावली. लक्ष्मीबाई सिद्रामप्पा हलबण्णा (वय-६९) असे मृत महिलेचे नाव आहे.
ही महिला तिच्या घरात एकटीच राहात असून, तिला फिट्सचा आजार असल्याने ती काही दिवसांपूर्वी घरात पडून जखमी झाली. त्यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला होता.तिने उपचार काहीच केले नसल्याने जखमेत रक्त साचून जखम वाढली होती.त्यामुळे ती राहत्या घरात मरण पावली.
शेजारील लोकांना घरातून उग्र वास येऊ लागल्याने लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी पाहणी, चौकशी केली असता तिचा पडून मृत्यू झाल्याचे उघड झाले. याबाबत सलगरवस्ती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.