21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसोलापूरकामगाराचे पलायन, दुकानदारास अडीच लाखांचा चुना

कामगाराचे पलायन, दुकानदारास अडीच लाखांचा चुना

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : मशीनवर सोन्याला डिझाईन करीत असताना मशीनच्या बाजूस पडलेला अडीच लाख रुपये किमतीचा ५५ ग्रॅम ८६० मिली वजनाचा सोन्याचा बारीक कीस (चुरा) गोळा करून कामगार पळून गेला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

अमीरुल इस्लाम असे त्या आरोपीने नाव आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समाधान बजरंग सावंत (४१, रा. रुक्मिणी शाळेजवळ, येळे वस्ती, पंढरपूर) यांच्या श्रावणी मनी आर्टचे सोन्याचे मणी डिझाईन करण्याच्या दुकानात सहा कामगार आहेत. डिझाईन करीत असताना सोन्याचा बारीक कीस (चुरा) मशीनच्या बाजूस पडतो. तो दररोज गोळा करून गोठवून सोने तयार केले जाते. २६ जुलैपर्यंत रात्री साडेदहा वाजेपर्यत मशीनवर सोन्यावर डिझाईन काम नेहमीप्रमाणे केले.

दिवसभर गोळा झालेले ५५ ग्रॅम ८६० मिली सोने (किंमत रुपये २ लाख ५० हजार रुपये) अमीरुल इस्लाम हा कोणास काही न सांगता चोरून घेऊन गेला आहे, अशी तक्रार सावंत यांनी दिली. पाच कामगार हे सांगली जिल्ह्यातील आहेत. एक कामगार एस. के. अमीरुल इस्लाम हा कोलकाता येथील आहे. दुकानातील सर्व कामगार दुकानातच राहतात. अमीरुल इस्लाम हा मागील आठ महिन्यांपासून त्यांच्याकडे कामास होता. त्याला दरमहा १८ हजार रुपये पगार व जेवणखाण्याची सोय केली होती. त्याने घराच्या बांधकामासाठी ६५ हजार रुपये उचलही घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या