28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home सोलापूर पर्यावरण संवर्धनासाठी सांगोल्यात वृक्ष बँकेची स्थापना

पर्यावरण संवर्धनासाठी सांगोल्यात वृक्ष बँकेची स्थापना

एकमत ऑनलाईन

सांगोला : वृक्षांचे आपल्या जीवनात अनन्य् साधारण महत्व आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या­ वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. हवामान बदल व जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मींग) मुळे आज सर्व जीवसृष्टी संकटात सापडलेली आहे. निसर्गाचा बिघडलेला हा समतोल सुधारण्याासाठी जगभर संघटित प्रयत्न होणे गरजेचे आहे. यातील अनेक मार्गांपैकी वृक्षारोपण व संवर्धन हा निसर्ग संवर्धनाचा उत्तम मार्ग आहे. नेमकी हीच बाब ओळखून दुष्का­ळी भागात मोडणा-या सांगोले नगरपरिषेने वसुंधरेच्या संरक्षणाकरीता ‘‘वृक्ष बँक’’ स्थाापनेचा अभिनव प्रयोग सुरु केला आहे. सदर वृक्ष बँकेची स्थांपना राज्यसशासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत केली असल्योची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

नगराध्यक्षा राणी माने, नुतन आरोग्य सभापती रफिकभाई तांबोळी, पाणीपुरवठा सभापती शोभात्घोंगडे, मुख्याधिकारीकैलास केंद्रे, कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने, अरोग्य निरीक्षक संजय दौंडे यांच्या, उपस्थितीमध्ये नगरपरिषद आवारात या वृक्ष बँकेच्या स्थापनेचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. शहरातील नागरिकांकडून झाडांची रोपे स्विकारून नगरपरिषदेमार्फत शहरात­ विविध ठिकाणी त्यांची लागवड व जतन करून सांगोले शहरास स्वच्छ, सुंदर व हरित बनविणे हा या वृक्ष बँकेचा प्रमुख उद्देश आहे. नेहमीच्या बँकेत ज्याप्रमाणे आपण पैश्यांच्या स्वरूपात ठेवी ठेवतो आणि काही वर्षांनी त्यापासून काहीतरी रिटर्न मिळतील अशी अपेक्षा ठेवतो. त्याचप्रमाणे या वृक्ष बँकेत प्रत्येकाने वृक्षांची रोपे आणि संरक्षण जाळ्या भेट देऊन ठेवीच्या स्वरूपात ठेवायची असून या रोपांना नगरपरिषदेमार्फत शहरात विविध ठिकाणी लावून त्यांचे संवर्ध केले जाईल.

सांगोला शहर व पर्यायाने तालुका हा दुष्कावळी भागात मोडत असून पाण्याची भूजल पातळी बरीच खोल आढळून येते. सबंध तालुक्या त पर्जन्याचे प्रमाण व वेळ यामध्ये कमालाची अनिश्चितता आढळून येते. सांगोला शहराचा विचार करता नवनवीन होणा-या बांधकामामुळे विकास होत असताना पर्यावरणाची हानी न होता शाश्वत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

कोरोनाच्या संकटाने आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या, लॉकडाउनच्या काळात सर्वच ठिकाणी प्रदुषणात मोठी घट झाली. पुर्वी चित्रकला स्पार्धेमध्ये अनेक मुले दोन डोंगराच्या मध्यभागी उगवणा-या सुर्याचे चित्र काढत असे. परंतु आज मुले हेच चित्र दोन इमारतीमधून उगवणा-या सुर्याचे काढतात. ही परिस्थिती धोकादायक असून स्व च्छ हवा, नद्या, डोंगर, निसर्ग, पर्यावरण या सर्वांची भावी पिढीसाठी जपवणूक करण्यााची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे. यात आपला खारीचा वाटा उचलण्याच्या हेतूने सांगोला नगरपरिषदेमार्फत या वृक्ष बँकेच्या­ अभिनव प्रयोगाची सुरुवात केल्यााची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

सांगोला शहरातील नागरिक, सामाजिक संस्था/मंडळे यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष बँकेस रोपे भेट देवून पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत सहभागी व्हावी. नागरिकांनी आपला सहभाग फक्त रोपे भेट देण्यापुरता मर्यादित न ठेवता या वृक्ष बँ­केमार्फत शहरात विविध ठिकाणी लागवड केल्या जाणा-या रोपांच्या संवर्धनात महत्वाची भूमिका बजावून या अभिनव उपक्रमाचा मूळ उद्देश यशस्वी करण्यास हातभार लावावा.
राणी माने, नगराध्यक्षा, सांगोला नगरपरिषद

वसंतदादा शुगर ची केंद्रे देशभरात निर्माण करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या