मंगळवेढा : शहराच्या एमआयडीसी परिसरातून मागील आठ दिवसांपूर्वी पळवून नेलेला चार वर्षीय बालक अद्यापही सापडलेला नाही. होडीच्या मा ध्यमातून भीमा नदीत शुक्रवारी दिवसभर शोध घेतला, मात्र बालक मिळून आलेला नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दि. १८ रोजी (रणजितकुमार साहू मूळ रा. छत्तीसगढ) या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. मागील आठवड्यापासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, तो मिळून येत नाही.
गुरुवारी माण नदीपात्रात शोध घेतला तेथेही तो मिळून न आल्याने शुक्रवारी उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी, माचणूर तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, आदी ठिकाणी भीमा नदीपात्रात दिवसभर होडीच्या माध्यमातून बोराळे बीट पोलिस हवालदार महेश कोळी, सोमनाथ माने, आदी कर्मचा-यांनी पाण्यात कसून शोध घेतला. मात्र, त्यास यश आले नाही. डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी व पोलिस कर्मचा-यांनी शोधमोहीम राबविली.