23.9 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home मराठवाडा दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

बुधवार पासून होणार अंमलबजावणी; मंदिर समितीचा निर्णय

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोनहजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र नित्योपचार दैनंदिन सुरु राहिले. मात्र दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खूली करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी गाभरा, श्री विठ्ठल सभामंड, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदीची कर्मचार्‍यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, त्याचबरोबर मंदिरात येणार्‍या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणार्‍या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजले पासून भाविकांना दर्शनाकरीता सोडण्यात येत आहे. ऑनलाईन बुकींग केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याने http://www.vitthalrukminimandir.org/home.html या संकेत स्थळावर बुकिंग भाविकांनी करावे, असे आवाहनहीं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

भाविकांसाठी नियमावली
– सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत 2000 भाविकांना मुख दर्शन घेता येणार
– प्रति तास 200 भाविकांना दर्शनाकरीता सोडणार
– ऑनलाईन दर्शन बुकींग करावे लागणार
– भाविकांनी 24 तास अगोदर ऑनलाईन बुकींग करावे,
– बुकींग 8 दिवसापर्यंत करता येणार
– मुख दर्शनाकरीता कासार घाट येथे पास तपासणी करुन दर्शनाला सोडणार
– कोरोनाची लक्षणे आढळणार्‍यांना दर्शन प्रवेश बंद
– मंदिराच्या पुर्व गेट मधून भाविक दर्शनाला आत जातील तर व्हीआयपी गेटमधून बाहेर पडतील
– दर्शन रांगेत फिजीकल डिस्टन्स (दोन भाविकात 6 फुट अंतर) ठेवण्यासाठी जागोजागी मार्किंग करण्यात आले आहे.
– अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहिल
– सध्या 65 वर्षावरील नागरिक, 10 वर्षाखालील बालक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येणे टाळावे

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

भाजपातर्फे राज्यभर वीज बिलांची होळी; वीज बिल माफी न केल्यास तीव्र आंदोलन !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) वाढीव वीज बिलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने वाढीव वीज बिले रद्द न केल्यास तीव्र...

दिल्ली,गुजरात, गोवा व राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) दिल्लीसह काही राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट महाराष्ट्रात येऊ नये यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. दिल्ली, राजस्थान,...

सोलापूर शहर जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शाळेला संमिश्र प्रतिसाद

सोलापूर : जिल्ह्यात जवळपास ८ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या असुन कोरोना प्रादुर्भावामुळे शहर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. शाळा सुरु होण्यापूर्वी...

भाजपच्या वतीने वीज बिलांची होळी

मोहोळ : संपूर्ण वीज बील माफी झालीच पाहिजे, कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय देत नाही, अशी जोरदार घोषणाबाजी करत मोहोळ तालुका भाजपाच्या वतीने...

शेवते रस्ता एक महिन्यापासून पाण्यात

जांबुड : पाझर तलावाच्या पाण्यात गेलेल्या नेमतवाडी ते शेवते रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेले लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले आणि पाहणी करून माघारी गेले परंतु...

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी

सोलापूर : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या...

नितिश मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

पाटणा : काही दिवसांपुर्वी शपथ घेतलेल्या बिहारमधील नितिशकुमार मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते. सध्या प्रत्येक मंत्र्याकडे पाच खात्यांची जबाबदारी दिली आहे....

फ्रान्सकडून पाकिस्तानला जोरदार चपराक

पॅरिस : पाकिस्तानकडे फ्रेंच बनावटीची मिराज फायटर विमाने, एअर डिफेन्स सिस्टिम आणि अगस्ता ९० बी वर्गातील पाणबुडी आहे. पाकिस्तानने या शस्त्रांमध्ये सुधारणा (अपग्रेडेशन) करण्याची...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...